पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs WI T20 Series : कसोटी आणि वनडेनंतर आता टीम इंडिया टी-20 मालिकेत वेस्ट इंडिजचा सामना करण्यासाठी सज्ज झाली आहे. 3 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या टी-20 मालिकेत एकूण 5 सामने खेळवले जाणार आहेत. पहिला सामना 3 ऑगस्ट रोजी ब्रायन लारा स्टेडियमवर होणार आहे, तर शेवटचा सामना 13 ऑगस्ट रोजी फ्लोरिडामध्ये होणार आहे. कसोटी, वनडेनंतर टीम इंडिया टी-20 मालिका जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
या मालिकेत टीम इंडिया पूर्णपणे बदलेल. कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत खेळलेले बहुतांश खेळाडू या मालिकेचा भाग नाहीत. वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे, तर काही नवे चेहरे मैदानावर दिसणार आहेत.
पहिल्या टी-20 मालिकेत टीम इंडियाच्या प्लेईंग 11 कडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. पहिल्या सामन्यात सलामीवीर म्हणून यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल तर तिसऱ्या क्रमांकावर तिलक वर्माला संधी मिळू शकते. तिलक आणि यशस्वी यांनी अद्याप टीम इंडियासाठी टी-20 पदार्पण केलेले नाही. या दोघांनी आयपीएल 2023 मध्ये आपापल्या संघांसाठी चमकदार कामगिरी केली आहे. (IND vs WI T20 Series)
स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर तर कर्णधार हार्दिक पंड्या पाचव्या क्रमांकावर खेळू शकतात. संजू सॅमसनचा सहाव्या क्रमांकावर यष्टिरक्षक फलंदाज म्हणून समावेश केला जाऊ शकतो. (IND vs WI T20 Series)
अष्टपैलू अक्षर पटेल सातव्या क्रमांकावर खेळेल, असे मानले जात आहे. त्याचवेळी युझवेंद्र चहल आणि रवी विश्नोई हे प्लेइंग 11 मध्ये पुनरागमन करू शकतात. अर्शदीप सिंग आणि मुकेश कुमार वेगवान गोलंदाजीची जबाबदारी सांभाळताना दिसतात.
यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार.
शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्य कुमार यादव (उपकर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई , अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान आणि मुकेश कुमार.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-20 मालिकेतील सर्व सामने भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होतील. टॉस साडेसात वाजता होईल. या टी-20 मालिकेचे लाईव्ह स्ट्रीमिंग फॅनकोड आणि जिओ सिनेमावर अनेक भाषांमध्ये उपलब्ध असेल. याशिवाय टीव्हीवर डीडी स्पोर्ट्सवरून थेट प्रक्षेपणही केले जाईल.
पहिला टी-20 सामना : 3 ऑगस्ट (त्रिनिदाद)
दुसरा टी-20 सामना : 6 ऑगस्ट (गियाना)
तिसरा टी-20 सामना : 8 ऑगस्ट (गियाना)
चौथा टी-20 सामना : 12 ऑगस्ट (फ्लोरिडा)
पाचवा टी-20 सामना : 13 ऑगस्ट (फ्लोरिडा)
रोव्हमन पॉवेल (कर्णधार), काइल मेयर्स (उपकर्णधार), जॉन्सन चार्ल्स, रोस्टन चेस, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, शाई होप, अकिल हुसैन, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, ओबेद मॅककॉय, निकोलस पूरन, रोमॅरियो शेफर्ड, ओडियन स्मिथ , ओशाने थॉमस.