पुढारी ऑनलाईन डेस्क : Ishan Kishan Half Centuries Hat Trick : टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्धची तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली आहे (WI vs IND ODI Series). युवा फलंदाज ईशान किशनसाठी (Ishan Kishan) ही मालिका खूपच खास राहिली. या मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये त्याने अर्धशतके झळकावली. या कामगिरीच्या जोरावर तो एकदिवसीय मालिकेतील 3 सामन्यांमध्ये सलग 3 अर्धशतके झळकावणाऱ्या टीम इंडियाच्या अनुभवी फलंदाजांच्या खास क्लबमध्ये सामील झाला आहे.
3 वनडेत 50 किंवा त्याहून अधिक धावा करणारा इशान (Ishan Kishan) हा सहावा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी कृष्णमाचारी श्रीकांत, दिलीप वेंगसरक, मोहम्मद अझरुद्दीन, एमएस धोनी, श्रेयस अय्यर यांनी अशी कामगिरी केली आहे. (Ishan Kishan Half Centuries Hat Trick)
कृष्णमाचारी श्रीकांत : 1982 विरुद्ध श्रीलंका
दिलीप वेंगसरकर : 1985 विरुद्ध श्रीलंका
मोहम्मद अझरुद्दीन : 1993 विरुद्ध श्रीलंका
एमएस धोनी : 2019 विरुद्ध ऑस्ट्रेलिया
श्रेयस अय्यर : 2020 विरुद्ध न्यूझीलंड
इशान किशन : 2023 विरुद्ध वेस्ट इंडिज
विंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत (Team India vs WI ODI) ईशान जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला. त्याने तिन्ही सामन्यांमध्ये अर्धशतके झळकावली आणि एकूण 184 धावा केल्या. या दमदार कामगिरीसाठी त्याला प्लेअर ऑफ द सिरीज म्हणूनही गौरविण्यात आले आहे. किशनने 61.33 च्या सरासरीने आणि 111.51 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. त्याने पहिल्या सामन्यात 46 चेंडूत 52, दुसऱ्या सामन्यात 55 चेंडूत 55 आणि तिसऱ्या सामन्यात 64 चेंडूत 77 धावा फटकावल्या. (Ishan Kishan Half Centuries Hat Trick)