India vs West Indies : मालिका कोण जिंकणार?, भारत- वेस्ट इंडिज यांच्यात आज तिसरा वन डे | पुढारी

India vs West Indies : मालिका कोण जिंकणार?, भारत- वेस्ट इंडिज यांच्यात आज तिसरा वन डे

त्रिनिदाद, वृत्तसंस्था : भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यातील तिसरा आणि निर्णायक एकदिवसीय सामना मंगळवारी (दि. 1) होणार आहे. तीन सामन्यांची ही मालिका 1-1 अशी बरोबरीत असून पहिल्या दोन सामन्यांत भारताने केलेले प्रयोग चांगलेच अंगाशी आले असून संंजू सॅमसन आणि सूर्यकुमार यादव यांना संधी देण्याचा प्रयोग आज तरी यशस्वी होणार का? हा प्रश्न आहे.

भारताने 2006 पासून वेस्ट इंडिजकडून एकही मालिका हरलेला नाही. भारताने रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना विश्रांती दिल्यामुळे बार्बाडोसमधील दुसर्‍या सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. सहा विकेटस्नी झालेल्या पराभवानंतर प्रशिक्षक राहुल द्रविडने आपल्या प्रयोगाचे समर्थन केले होते. तो म्हणाला, आम्ही नेहमी विस्तीर्ण चित्र पाहतो. एशिया कप आणि वर्ल्डकप येत आहे. त्याआधी खेळाडू जखमी होऊ शकतात. त्यासाठी बॅकअप लॉट तयार असायला हवा. आम्ही एका सामन्याचा किंवा मालिकेचा विचार करीत नाही.

टी-20 क्रिकेटमध्ये दादा असलेला सूर्यकुमार यादव पन्नास षटकांच्या क्रिकेटमध्ये मात्र धावांसाठी संघर्ष करताना दिसत आहे. त्याला संधी मिळत असूनही तो साध्य करताना दिसत नाही. तर दुसरीकडे संजू सॅमसनही अपयशी ठरत आहे, पण त्याला तुलनेने कमी संधी मिळाल्या आहेत.

श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त असल्याने संघ व्यवस्थापन सूर्यकुमार यादवला संधी देत आहेत. पण, टी-20 चा फॉर्म त्याला वन डेत दाखवता आलेला नाही. अशात तिसरी वन डे संजू व सूर्यासाठी वर्ल्डकप स्पर्धेसाठी जागा पक्की करण्यासाठीची शेवटची संधी असेल. सूर्याला 12 सामन्यांत 13.60च्या सरासरीने धावा करता आल्या आहेत, तर सॅमसनची सरासरी ही 73.66 अशी राहिली आहे.

विराट आजही खेळणार नाही? (India vs West Indies)

तिसर्‍या सामन्यासाठी भारतीय संघ पोर्ट ऑफ स्पेनला दाखल झाला आहे; परंतु विराटने संघासोबत प्रवास केलेला नाही. त्यामुळे तो मंगळवारच्या सामन्यात खेळणार नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. रोहित मात्र खेळणार आहे. पण, त्यासाठी संघातून अक्षर पटेल याला बाहेर बसावे लागू शकते.

संघ यातून निवडणार

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, इशान किशन (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शार्दूल ठाकूर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार.

वेस्ट इंडिज : शाय होप (कर्णधार, यष्टिरक्षक), रोव्हन पॉवेल, एलिक अथांजे, यानिक कारिया, किसी कार्टी, डॉमिनिक ड्रेक्स, शिमरोन हेटमायर, अल्झारी जोसेफ, ब्रेंडन किंग, कायले मेयर्स, गुडाकेश मोती, जेडेन सील्स, रोमारिओ शेफर्ड, केविन सिनक्लेयर, ओशाने थॉमस.

तिसरा वन डे सामना

स्थळ : तारौबा, त्रिनिदाद
वेळ : रात्री : 7.00 वा. पासून
थेट प्रक्षेपण : डीडी स्पोर्टस्
लाईव्ह स्ट्रिमिंग : फॅन कोड अ‍ॅप,
जिओ सिनेमा

हेही वाचा…

Back to top button