Mumbai Indians New York : ‘मुंबई इंडियन्स’ने अमेरिकेतील टूर्नामेंट जिंकली! निकोलस पुरनचे 40 चेंडूत वादळी शतक | पुढारी

Mumbai Indians New York : ‘मुंबई इंडियन्स’ने अमेरिकेतील टूर्नामेंट जिंकली! निकोलस पुरनचे 40 चेंडूत वादळी शतक

पुढारी ऑनलाईन डेस्क : Mumbai Indians New York : मेजर लीग क्रिकेट 2023 च्या अंतिम सामन्यात (Major League Cricket) निकोलस पूरन (nicholas pooran) नावाचे वादळ आले, ज्याने सिएटल ऑर्कास (seattle orcas) संघाची षटकार आणि चौकारांच्या पावसात धूळधाण उडवली. पुरनच्या शतकी खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्स न्यूयॉर्क संघाने सिएटल ऑर्कासचा 7 गडी राखून पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. एमआय फ्रँचायझीला (mi new york) आयपीएलच्या (IPL) गेल्या 3 हंगामात विजेतेपदाने हुलकावणी दिली आहे. पण अमेरिकेत पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या टी-20 लीग स्पर्धेची ट्रॉफी उंचावून ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

अंतिम सामन्यात सिएटल ऑर्कास (seattle orcas) संघाने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 9 बाद 183 धावा केल्या. मुंबई इंडियन्स न्यूयॉर्कसमोर (mi new york) विजयासाठी 184 धावांचे लक्ष्य होते. पण, पाठलाग करताना एमआय न्यूयॉर्क संघाची सुरुवात चांगली झाली नाही. डावाच्या पहिल्याच षटकात शून्य धावसंख्येवर स्टीव्हन टेलरच्या रूपाने संघाला पहिला धक्का बसला. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या कर्णधार निकोलस पूरनने (nicholas pooran) येताच आपले इरादे स्पष्ट केले. एका टोकाकडून सातत्याने आक्रमण करत राहिला. त्याने 6 षटकांत चक्क 80 धावांपर्यंत मजल मारली.

पूरनने (nicholas pooran) आक्रमक खेळी करून पहिल्या 16 चेंडूत 50 धावा ठोकल्या. त्यानंतर या अर्धशतकाचे रुपांतर शतकामध्ये करून संघाला विजय मिळवून दिला. त्याने 250 च्या स्ट्राइक रेटने टी-20 क्रिकेटमधील आपले दुसरे शतक फटकावले. त्याची खेळी किती वेगवान आणि स्फोटक होती, हे त्याच्या स्ट्राईक रेटवरून कळते. पूरनने या सामन्यात 55 चेंडूंचा सामना करत नाबाद 137 धावा केल्या, जी त्याच्या टी-20 कारकिर्दीतील सर्वात मोठी धावसंख्या आहे. पुरनच्या खेळीत 13 षटकार आणि 10 चौकारांचा समावेश होता. संघाला त्याची सर्वाधिक गरज असताना त्याने ही अप्रतिम झंझावाती खेळी साकारली. जेव्हा तो क्रिझवर उतरला होता, तेव्हा संघ अडचणीत आला होता. पण पुरनने आत्मविश्वासाने शतकी खेळीकरून मुंबई इंडियन्सला चॅम्पियन बनवले.


आता पूरन (nicholas pooran) पूर्ण फॉर्ममध्ये असताना, बाकीच्या फलंदाजांसाठी काय करायचे आहे. या सामन्यातही तेच घडले. 184 धावांच्या लक्ष्यासमोर त्यांनी एकट्याने 137 धावा केल्या. अशा स्थितीत उर्वरित फलंदाजांनी एक प्रकारे सहाय्यक भूमिका बजावली. पुरनच्या झंझावातामुळे मुंबई इंडियन्स न्यूयॉर्कने (mi new york) सिएटल ऑर्कासचे लक्ष्य 24 चेंडू आधी पूर्ण केले. त्याने 16व्या षटकात सामना संपवला आणि 7 विकेट्स राखून विजय आपल्या नावावर केला.

पूरनने डेवाल्ड ब्रेविससोबत तिसऱ्या विकेटसाठी 44 चेंडूत 75 धावांची भागीदारी केली. एमआय न्यूयॉर्कला (Mumbai Indians New York) या सामन्यात तिसरा धक्का 137 धावांवर ब्रेविसच्या रूपाने बसला, जो 20 धावा करून धावबाद झाला. यानंतर निकोलस पूरनने आपले शतक पूर्ण करून संघाला विजय मिळवून दिला. पूरनच्या बॅटने 55 चेंडूत 10 चौकार आणि 13 षटकारांच्या मदतीने नाबाद 137 धावांची खेळी साकारली.


सिएटल ऑर्कास संघासाठी सलामीला आलेला यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक याने 52 धावा 87 धावांची अप्रतिम खेळी केली. यादरम्यान डिकॉकने 4 षटकार आणि 9 चौकार लगावले. त्याच्याशिवाय एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. परिणामी सिएटल संघ अंतिम सामन्यात पराभूत झाला. न्यूयॉर्क संघाकडून (Mumbai Indians New York) ट्रेंट बोल्ट आणि राशिद खान यांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतले. सिएटल ऑर्काससाठी इमाद वसीम आणि कर्णधार वेन पार्नेल यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.

मुंबई इंडियन्सची नववी ट्रॉफी (Mumbai Indians)

चॅम्पियन्स लीग 2011
आयपीएल 2013
चॅम्पियन्स लीग 2013
आयपीएल 2015
आयपीएल 2017
आयपीएल 2019
आयपीएल 2020
डब्ल्यूपीएल 2023
मेजर लीग क्रिकेट 2023

Back to top button