Stuart Broad Retirement : गुडबाय क्रिकेट! स्टुअर्ट ब्रॉडने केली निवृत्तीची घोषणा

Stuart Broad Retirement : गुडबाय क्रिकेट! स्टुअर्ट ब्रॉडने केली निवृत्तीची घोषणा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Stuart Broad Retirement : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने निवृत्तीची घोषणा केली असून अॅशेस मालिका (Ashes Series) संपताच तो क्रिकेटला अलविदा करणार आहे. सोमवारी 31 जुलै रोजी माझा क्रिकेटमधील शेवटचा दिवस असेल, असे म्हणत ब्रॉडने जगभरातील क्रिकेट चाहत्यांना धक्का दिला. त्यामुळे यापुढे आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत क्रिकेट सामने खेळताना तो दिसणार नाही. 37 वर्षीय ब्रॉडने 2006 मध्ये इंग्लंडकडून पदार्पण केले होते. जवळपास 17 वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीनंतर तो आता खेळणे बंद करत आहे.

'इंग्लंसाठी खेळणे हा सुखद अनुभव' (Stuart Broad Retirement)

37 वर्षीय स्टुअर्ट ब्रॉडने (Stuart Broad) नुकतेच कसोटी क्रिकेटमध्ये 600 विकेट्सचा टप्पा पार केला आहे. शनिवारी (दि. 29) ओव्हल कसोटीच्या तिसर्‍या दिवसाचा खेळ संपल्यानंतर त्याने अचानक सर्वांना धक्का देत निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले. निवृत्तीची घोषणा करताना ब्रॉड म्हणाला, ओव्हल कसोटीचा शेवटचा आणि पाचवा दिवस माझा क्रिकेटमधील शेवटचा दिवस असेल. गेली 17 वर्षे मी इंग्लंड संघाचे प्रतिनिधित्व केले हा माझ्यासाठी सर्वात सुखद आणि समाधानाचा अनुभव होता. शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता मी माझ्या क्रिकेट कारकिर्दीला पूर्ण विराम देण्याचे ठरवले. या निर्णयापर्यंत पोहचण्यापूर्वी मी गेल्या आठवड्यापासून विचार करत होतो. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामने माझ्यासाठी सर्वोत्तम राहिले आहेत. अॅशेसमध्ये खेळणे मला प्रचंड आवडायचे. त्यामुळे मला वाटते की माझा शेवटचा सामना अॅशेस मालिकेतीलच असावा, अशी भावना त्याने व्यक्त केली. (Stuart Broad Retirement)

कसोटीत 600 हून अधिक बळी

स्टुअर्ट ब्रॉडने (Stuart Broad) 2007 मध्ये श्रीलंकेविरूद्ध कसोटी प्रदार्पण केले. त्याच्या नावावर आतापर्यंत 167 कसोटी खेळताना 602 विकेट्सची नोंद झाली आहे. सध्या सुरू असलेल्या ॲशेस मालिकेत त्याने 600 बळींचा टप्पा पूर्ण केला. कसोटीसह 121 वनडे सामन्यांमध्ये ब्रॉडने 178, तर 56 टी-20 लढतीत 65 बळी घेतले आहेत. एकूण कार्किर्दीत त्याने 20 वेळा 5 विकेट्स तर 3 वेळा 10 विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे.

कसोटी फलंदाजीत समाधानकारक योगदान

वेगवान आक्रमणाची यशस्वीरित्या धुरा सांभाळताना ब्रॉडने (Stuart Broad) फलंदाजीतही समाधानकारक कामगिरी केली. त्याने 243 डावात 3,656 धावा केल्या आहेत. यादरम्यान, त्याच्या खात्यात 1 शतक आणि 13 अर्धशतके जमा आहेत. त्याच्या नावावर 438 चौकार आणि 54 षटकार आहेत. तो एकदिवसीय आणि टी-20 मध्ये फलंदाजीची छाप सोडू शकला नाही. ब्रॉडच्या (Stuart Broad) नावावर वनडेत 529 तर टी20 मध्ये 118 धावा आहेत. त्याचे वडील ख्रिस ब्रॉड हे देखील इंग्लंडकडून खेळले आहेत. सध्या ते आयसीसी सामनाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

600 बळी घेणारा दुसरा वेगवान गोलंदाज

ब्रॉडच्या (Stuart Broad) आधी कसोटी क्रिकेटच्या इतिहासात मोजक्याच गोलंदाजांनी 600 पेक्षा जास्त विकेट्स घेण्याची किमया केली. यात मुरलीधरन, शेन वॉर्न, जेम्स अँडरसन, अनिल कुंबळे यांचा समावेश आहे. या यादीत आता ब्रॉडने आपल्या नावाची नोंद केली आहे. याचबरोबर कसोटी क्रिकेटमध्ये 600 बळींचा टप्पा गाठणारा केवळ दुसरा वेगवान गोलंदाज ठरला आहे. तर त्याचा संघ सहकारी जेम्स अँडरस 690 बळींसह पहिल्या स्थानावर आहे. (Stuart Broad Retirement)

ब्रॉड सहाव्या क्रमांकावर

ब्रॉड (Stuart Broad) हा सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याच्या बाबतीत सचिन तेंडुलकर (200), जेम्स अँडरसन (183*), रिकी पाँटिंग (182), स्टीव्ह वॉ (168) यांच्यानंतर सहाव्या क्रमांकावर आहे. 30 ऑगस्ट 2006 रोजी पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या ब्रॉडने शेवटचा वनडे 14 फेब्रुवारी 2016 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. तर 2014 मध्ये त्याने शेवटचा टी-20 सामना खेळला. 2010 मध्ये टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या इंग्लंड संघाचाही तो भाग होता.

अँडरसन-ब्रॉड सर्वात यशस्वी वेगवान जोडी

जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड ही कसोटी इतिहासातील सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाजीची जोडी आहे. दोघांनी मिळून 138 सामने खेळले आहेत, ज्यात त्यांनी 1037 फलंदाजांची शिकार केली. त्यांच्याशिवाय फक्त शेन वॉर्न आणि ग्लेन मॅकग्रा या जोडीनेच 1000 पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलियन जोडीने एकत्र खेळताना 104 सामन्यात 1001 बळी मिळवले.

ॲशेसमध्ये 150 'शिकार' Stuart Broad Retirement

ओव्हल कसोटीच्या दुस-या दिवशी ब्रॉडने ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. अ‍ॅशेस मालिकांच्या (Ashes Series) इतिहासात 150 विकेट घेणारा तो इंग्लंडचा पहिला गोलंदाज ठरला. त्याने इयान बोथम (148) यांना मागे टाकले आहे. ॲशेसमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत ब्रॉडने तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. त्याची एका डावातील सर्वोत्तम कामगिरी 15 धावांत 8 विकेट्स आहे. अ‍ॅशेसमध्ये (Ashes Series) सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम शेन वार्नच्या नावावर आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू वॉर्नने 72 डावात 195 बळी तर दुस-यास्थानी असणा-या मॅकग्राने 60 डावात 157 बळी घेतले आहेत.

मायदेशात सर्वाधिक विकेट घेणारा तिसरा गोलंदाज

स्टुअर्ट ब्रॉडने मायदेशात 396 विकेट्स घेत आहेत. मुथय्या मुरलीधरन (493) आणि जेम्स अँडरसन (434) नंतर घरच्या मैदानावर सर्वाधिक विकेट घेणारा तिसरा गोलंदाज आहे.

वॉर्नरला 17 वेळा केले बाद

ब्रॉडने कसोटी क्रिकेटमध्ये 17 वेळा डेव्हिड वॉर्नरला बाद केले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये एका फलंदाजाला सर्वाधिक वेळा बाद करण्याच्या बाबतीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.

10 वेळा सहा फलंदाजांना बाद

ब्रॉड हा असा गोलंदाज आहे ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये किमान 10 वेळा सहा फलंदाजांना बाद केले आहे. इतर कोणत्याही गोलंदाजाने असा पराक्रम केलेला नाही. ग्लेन मॅकग्रा, कर्टली अॅम्ब्रोस, कपिल देव, माल्कम मार्शल आणि कोर्टनी वॉल्श यांनी कसोटी क्रिकेटमध्ये किमान 10 वेळा पाच फलंदाजांना बाद केले होते.

2019 पासून 169 बळी घेण्याचा पराक्रम

2019 पासून ब्रॉडने कसोटी क्रिकेटमध्ये 169 बळी घेतले आहेत, जे या कालावधीतील कोणत्याही गोलंदाजापेक्षा सर्वाधिक आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news