Mohammed Siraj : भारताला मोठा धक्का! विंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेतून सिराज बाहेर | पुढारी

Mohammed Siraj : भारताला मोठा धक्का! विंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेतून सिराज बाहेर

पुढारी ऑनलाईन डेस्क : वेस्ट इंडिजविरुद्धची वनडे मालिका सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे (west indies vs india odi series). संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) मालिकेतून बाहेर पडला असून तो आर अश्विन, अजिंक्य रहाणे, केएस भरत आणि नवदीप सैनी यांच्यासह मायदेशी परतला आहे. घोट्याच्या दुखापतीमुळे खबरदारी म्हणून सिराजला (Mohammed Siraj) विश्रांती दिल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, त्याच्या जागी बदली गोलंदाजाची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही.

गुरुवारी पहिला एकदिवसीय सामना (west indies vs india odi series)

वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना आज, गुरुवारी (दि. 27) बार्बाडोस येथे खेळवला जाणार आहे. पण या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा (Team India) वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला (Mohammed Siraj) या मालिकेतून अचानक विश्रांती देण्यात आली आहे. शमीच्या अनुपस्थितीत या दौऱ्यात सिराज हा महत्त्वाचा वेगवान गोलंदाज होता, पण आगामी आशिया कप आणि विश्वचषक 2023 सारख्या मोठ्या स्पर्धा लक्षात घेऊन त्याला मायदेशी पाठवण्यात आल्याचे काहींचे म्हणणे आहे. सिराजने विंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत सात विकेट घेऊन उपयुक्त कामगिरी केली. दुस-या कसोटीत त्याने विंडिजच्या पहिल्या डावाला खिंडार पाडत 5 बळी मिळवले होते. वनडे मालिकेत त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या, पण आता तो या मालिकेतून बाहेर पडला आहे.

सिराजला विश्रांती का दिली? बीसीसीआयचे स्पष्टीकरण (Mohammed Siraj)

सिराजला विश्रांती का देण्यात आली आहे, यावर बीसीसीआय एक निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेपूर्वी (west indies vs india odi series) मोहम्मद सिराजला टीम इंडियाच्या वनडे संघातून मुक्त करण्यात आले आहे. उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज घोट्याच्या दुखण्याने त्रस्त असून त्याला बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने खबरदारीचा उपाय म्हणून विश्रांतीचा सल्ला दिला आहे. दरम्यान, बार्बाडोस येथे सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी संघाने बदली खेळाडूची मागणी केलेली नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

वेगवान मा-याची जबाबदारी ‘या’ गोलंदाजांवर

वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारताकडे आता उमरान मलिक, हार्दिक पंड्या, जयदेव उनाडकट, मुकेश कुमार आणि शार्दुल ठाकूर हे वेगवान गोलंदाज आहेत. अशा स्थितीत हार्दिक पंड्यासाठी संपूर्ण 10 षटके टाकणे महत्त्वाचे ठरणार आहे.

भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, उमरान मलिक, मुकेश कुमार

सिराजने शेवटचा एकदिवसीय सामना मार्च 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात खेळला होता. 2022 च्या सुरुवातीपासून सिराज हा भारतासाठी सर्वाधिक 43 एकदिवसीय विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. या दौऱ्यापूर्वी तो ओव्हल येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचाही भाग होता, ज्यामध्ये त्याने पहिल्या डावात चार आणि दुस-या डावात एक विकेट घेतली होती. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरसाठी आयपीएल 2023 मध्येही त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती, जिथे त्याने 14 सामन्यांमध्ये 19 विकेट घेतल्या होत्या. फ्रँचायझीसाठी तो सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला होता.

सिराजच्या अनुपस्थितीत शार्दुल ठाकूर भारतीय संघातील सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज आहे. शार्दुलच्या नावावर 35 सामन्यांत 50 बळी आहेत. अन्य तीन वेगवान गोलंदाजांमध्ये उमरान मलिक, जयदेव उनाडकट आणि मुकेश कुमार यांचा समावेश आहे. दोघांनी मिळून 15 वनडे खेळले आहेत. मुकेशचे एकदिवसीय पदार्पण व्हायचे आहे.

Back to top button