

टी-२० वर्ल्डकपमध्ये रविवार भारताचा मुकाबला न्यूझीलंडबरोबर (Twenty20 World Cup: ) होणार आहे. दोन्ही संघासाठी हा सामना महत्वपूर्ण आहे. कारण दोन्ही संघानी या स्पर्धेतील आपला पहिला सामना गमावला आहे. या सामन्यापूर्वी कर्णधार विराट कोहली याने विविध मुद्यावर आपली भूमिका आज स्पष्ट केली.
व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत विराट म्हणाला की, पाकिस्तानविरोधातील सामन्यात आम्ही कोणत्या चुका केल्या याची आम्हाला माहिती आहे. न्यूझीलंडविरोधातील सामन्यात या चुका आम्ही टाळण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पाकिस्तान विरोधातील सामन्यात पराभव झाल्यानंतर भारताचा वेगवान गोलंदाज शमी याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आले. यावरही विराटने तीव्र आक्षेप नोंदवला. धर्माच्या आधारे एखाद्या खेळाडूला टार्गेट करणे ही सर्वात वाईट गोष्ट असल्याचे त्याने म्हटले आहे. वर्ल्डकप स्पर्धेमध्ये तुम्ही मानसिक दृष्ट्या मैदानावर कसे उतरता, हे फार महत्वाचे ठरते. आमच्या संघातील फलंदाजांनाही अशीच तयारी करावी लागेल.
पाकिस्तानविरोधातील सामन्यात पराभव झाल्याबद्दल बोलताना विराट म्हणाला, वर्ल्डकप स्पर्धेत एका सामन्यात पराभव झाला म्हणून बिघडत नाही. एकाच संघाविरोधातील सर्वात महत्वपूर्ण असतो असे होत नाही. आमच्यासाठी प्रत्येक सामना हा महत्वपूर्ण असतो.
शार्दुल ठाकूर न्यूझीलंडविरोधातील सामन्यात खेळणार का? या प्रश्नावर विराट म्हणाला, शार्दुल ठाकूर कोणत्या स्थानावर खेळणार हे पहावे लागेल. मात्र सध्या तरी याबाबत स्पष्टपणे सांगता येणार नाही. आम्हाला याबाबत भविष्यात पहावे लागले. मागील सामन्यात प्रतिस्पर्धी संघाने उत्कृष्ट खेळ केला, हे आम्हाला मान्य करावेच लागेल, असेही त्याने नमूद केले.
सामन्यामध्ये टॉस हा महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे. मात्र टॉस म्हणजे सर्वस्व नाही. याबाबत मी जास्त विचार करत नाही. आमच्या संघातील सर्व ११ खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करावे, यावर आमचा फोकस असल्याचेही कर्णधार विराट कोहलीने या वेळी स्पष्ट केले.
हेही वाचलं का?