

अमरावती जिल्ह्यातील तिवसा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याने प्रत्येक फाइलमागे पाच हजार रुपयांची मागणी केल्याने तणावामुळे अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यांच्या मृत्यूनंतर एक ऑडिओ क्लिप समोर आली असून त्यातून हा खुलासा झाला आहे.
रोजगार हमी योजनेकडे कंत्राटी पद्धतीने प्रमोद निंबोरकर कार्यरत होते. त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. गटविकास अधिकाऱ्याने त्यांना कार्यमुक्त केल्याने ते तणावात होते.
अमरावतीच्या वरुड तालुक्यातील प्रमोद निंबोरकर तिवसा पंचायत समितीकडे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना विभागात तांत्रिक अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांना कार्यमुक्त करावे, असा प्रस्ताव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. चेतन जाधव उपजिल्हाधिकारी राम लंके यांना पाठविला होता. लंके यांनी कुठलीही शहानिशा न करता निंबोरकर यांना बाजू मांडण्याची संधी न देता कार्यमुक्तीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला. त्यामुळे त्यांची नोकरी गेली. त्यानंतर अचानक मोर्शी-वरूड रोडवर अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू झाला.
तपुर्वी प्रमोद निंबोरकर यांनी उपजिल्हाधिकारी राम लंके यांना फोन करून आपली व्यथा मांडली होती. गटविकास अधिकारी डॉ. जाधव सिंचन विहिरीच्या प्रत्येक फाईलमागे पाच हजार रुपये गोळा करण्यास सांगत आहेत, असे लंके यांना निंबोरकर फोनवरून सांगत असल्याची ही ऑडिओ क्लिप आहे. निंबोरकर यांचा मृत्यू हा अपघात आहे की आत्महत्या, याचा तपास सुरू झाला आहे.
हेही वाचा :