World Cup T20 : पाकिस्‍तानची हॅट्ट्रिक, भारताचा सेमिफायनलमधील मार्ग झाला सुकर - पुढारी

World Cup T20 : पाकिस्‍तानची हॅट्ट्रिक, भारताचा सेमिफायनलमधील मार्ग झाला सुकर

दुबई : पुढारी ऑनलाईन

टी-२० वर्ल्डकपमध्‍ये  ( World Cup T20 : ) पाकिस्‍तानने शुक्रवारी (दि.२९) अफगाणिस्‍तानवर विजय मिळवला. स्‍पर्धेतील हा त्‍यांचा सलग तिसरा विजय. पाकिस्‍तानच्‍या या कामगिरीमुळे भारताचा सेमिफायनलमधील मार्ग आणखी सुकर झाल्‍याचे मानले जात आहे.

भारतासाठी रविवारचा दिवस ठरणार महत्‍वपूर्ण

टी-२० वर्ल्डकपमध्‍ये सलग तिसरा विजय मिळवल्‍याने पाकिस्‍तानने आपले सेमिफायनलमधील स्‍थान जवळपास नक्‍की केले आहे. शुक्रवारी झालेल्‍या सामन्‍यात पाकिस्‍तानने अफगाणिस्‍तानचा पाच विकेट्‍स राखून पराभव केला. या विजयामुळे दुसर्‍या ग्रुपमध्‍ये पाकिस्‍तान अग्रस्‍थानी आहे. तर या ग्रुपमधील  भारत आणि न्‍यूझीलंड या दोन्‍ही संघामध्‍ये दुसर्‍या स्‍थानासाठी चुरस असणार आहे. भारतासाठी रविवारचा दिवस महत्‍वपूर्ण ठरणार असून न्‍यूझीलंड विरोधातील सामना जिंकावाच लागणार आहे. कारण या सामन्‍यात जो संघ विजय होईल त्‍याचा सेमिफायनल प्रवेश जवळपास नक्‍की होईल, असे मानले जात आहे.

( World Cup T20 :)आता रनरेटचे टेन्‍शन नाही

टी-२० वर्ल्डकप स्‍पर्धेतील अफगाणिस्‍तानची सुरुवात चांगली झाली होती. त्‍यांनी पहिल्‍या सामन्‍यात स्‍कॉटलंडचा पराभव केला होता. अफगाणिस्‍तानने सलग दुसरा सामना जिंकला असता तर सेमिफायनलच्‍या रेसमधील या संघाचा दावा कायम राहिला असता. भारताचा सेमिफायनलचा मार्गही खडतर झाला असता.  हा संघ रन रेटमध्‍ये भारताला वरचढ ठरला असता. पुढील सर्व गणित हे रन रेटवर अवलंबून होते. आता अफगाणिस्‍तानचाच पराभव झाल्‍यामुळे रेन रेटचा टेन्‍शन राहणार नाही.

अशी ठरतील पुढील समीकरणे

दुसर्‍या ग्रुपमध्‍ये भारत, पाकिस्‍तान आणि न्‍यूझीलंड हेच संघ बलाढ्य आहे.  भारत आणि न्‍यूझीलंड हे अफगाणिस्‍तान, स्‍कॉटलंड आणि नामिबिया विरोधातील सामने जिंकतीलच, असे मानले जात आहे. भारताने जर न्‍यूझीलंडचा पराभव केला यानंतरचे सर्व सामने जिंकल्‍यास गुणतालिकेत भारत ८ गूण घेवून दुसर्‍या स्‍थानावर राहिल. तर १० गुणांसह पाकिस्‍तान पहिल्‍याच क्रमांकावर असले.

भारतासमोर मोठे आव्‍हान

टी-२० वर्ल्डकपमध्‍ये पहिल्‍याच सामन्‍यात भारताचा पाकिस्‍तानविरोधात नामुष्‍कीजनक पराभव झाला. भारतीय संघाच्‍या कामगिरीने देशवासियांची निराशा झाली आहे. मात्र यानंतर पाकिस्‍तानने न्‍यूझीलंडचाही पराभव केला. यामुळे भारताला स्‍पर्धेत पुन्‍हा कमबॅक करण्‍यासाठी भारताला न्‍यूझीलंडविरोधातील सामना जिंकावाच लागणार आहे.

वर्ल्डकपमधील मागील १८ वर्षांच्‍या इतिहास पाहता न्‍यूझीलंडविरोधातील प्रत्‍येक सामना भारतासाठी खडतरच ठरला आहे. क्रिकेट वर्ल्डकपमध्‍ये न्‍यूझीलंडविरोधात भारताची कामगिरी खूपच खराब आहे. २००३ पासून वर्ल्डकप स्‍पर्धेत भारताने न्‍यूझीलंडविरोधात एकही सामना जिंकलेला नाही. आता ३१ ऑक्‍टोबर रोजी दोन्‍ही संघ आमने-सामने असतील, तेव्‍हा जगातील क्रिकेट प्रेमींचे लक्ष या सामन्‍याकडे वेधलेले असेल.

हेही वाचलं का?

 

Back to top button