West Indies vs India, 2nd Test : वेस्ट इंडिजला २८९ धावांची गरज | पुढारी

West Indies vs India, 2nd Test : वेस्ट इंडिजला २८९ धावांची गरज

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी भारताने विंडीसमोर ३६५ धावांचे लक्ष्य ठेवले. भारताने पहिल्या डावात ४३८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने पहिल्या डावात २५५ धावा केल्या. भारताने २ बाद १८१ धावा करून दुसरा डाव घोषित केला. प्रत्युत्तरात यजमानांनी चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत २ बाद ७६ धावा केल्या आहेत. वेस्ट इंडिजला २८९ धावांजी गरज आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पोर्ट ऑफ स्पेन येथे खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवसाचा खेळ संपला. टीम इंडियाने वेस्ट इंडिजसमोर ३६५ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात दिवसाचा खेळ संपेपर्यंत यजमानांनी २ बाद ७६ धावा केल्या आहेत. चौथ्या दिवसाचा खेळही पावसामुळे खंडित झाला. दुसऱ्या सत्राचा खेळात तर पावसाने खोडा घातला. पाचव्या दिवशीही खेळ अर्धा तास आधी सुरू होईल. वेस्ट इंडिजचे आठ विकेट्स घेण्यासाठी भारताला जवळपास ९८ षटके बाकी आहेत.

हेही वाचा : 

Back to top button