WI vs IND Test : एका सामन्‍यात १२ विकेट! अश्‍विनच्‍या नावावर ‘खास’ विक्रमाची नोंद | पुढारी

WI vs IND Test : एका सामन्‍यात १२ विकेट! अश्‍विनच्‍या नावावर 'खास' विक्रमाची नोंद

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात रविचंद्रन अश्विनने १२ विकेट घेतल्‍या. या सामन्‍यातील दुसर्‍या डावात अश्‍विनने ७ बळी घेत तिसर्‍याच दिवशी सामन्‍याचा निकाल लावला. या कामगिरीमुळे त्‍याने एका खास विक्रमाची  नाेंद आपल्‍या नावावर केली आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने उत्‍कृष्‍ट खेळी करत डावासह १४१ धावांनी विजय मिळवला. या विजयात फिरकीपटू अश्विनने मोलाची कामगिरी बजावली. त्‍याने दोन्‍ही डावात एकूण १२ बळी घेतले. अश्विनने पहिल्‍या डावात ५ तर दुसर्‍या डावात ७ विकेट घेतल्या. या कामगिरीमुळे त्‍याने एका खास विक्रमाची बरोबरी केली आहे.

WI vs IND Test : अनिल कुंबळेचा विक्रमाशी बराेबरी

अश्विन याने कसाेटी क्रिकेटमध्‍ये आठव्यांदा १० किंवा त्याहून अधिक बळी घेतले आहे. त्‍याने टीम इंडियाचे माजी फिरकीपटू अनिल कुंबळे यांच्‍या विक्रमाशी बरोबरी केली आहे. कुंबळे यांनी त्याच्या कसोटी कारकिर्दीत आठवेळा १० किंवा त्याहून अधिक बळी मिळवले हाेते. आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्यांमध्ये अश्विन याला कुंबळेचा  विक्रम मोडण्‍याची संधी असेल. कसोटी सामन्यात सर्वाधिक वेळा १० किंवा त्यापेक्षा जास्त बळी घेण्‍याची कामगिरी भारतीय गोलंदाजामध्‍ये अनिल कुंबळे आणि अश्‍विन यांनी आठवेळा केली आहे. तर फिरकीपटू हरभजन सिंग याने पाचवेळा १० किंवा त्‍यापेक्षा अधिक बळी घेतले आहेत.

WI vs IND Test : विदेशात अश्‍विनची सर्वोत्तम गोलदाजी

अश्विनने ३४ वेळा एका डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्यात यश मिळविले आहे. विदेशी भूमीवर अश्विनची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी सामन्यात सर्वाधिक विकेट घेणारा अश्विन हा चौथा भारतीय गोलंदाज ठरला आहे.अश्विनने श्रीनिवास वेंकटराघवन यांचा विक्रम मोडीत काढला आहे. श्रीनिवास वेंकटराघवन यांनी भारत वेस्ट इंडिज कसोटी मालिकेत एकूण ६८ विकेट घेतल्या होत्‍या. अश्विनने वेस्‍ट इंडिजमध्‍ये खेळताना ७२ विकेट घेतल्या आहेत. वेस्‍ट इंडिजमध्‍ये सर्वाधिक विकेट घेण्‍यात कपिल देव अग्रस्‍थानी आहेत. त्‍यांनी एकूण ८९ विकेट्स घेतल्‍या आहेत. .

भारत-वेस्ट इंडिजमध्‍ये  सर्वाधिक विकेट घेणारे भारतीय गोलंदाज पुढील प्रमाणे कसांत विकेट : कपिल देव (८९), अनिल कुंबळे (७४), रविचंद्रन अश्विन (७ ) श्रीनिवास वेंकटराघवन (६ )

विदेशात कसोटी क्रिकेटच्‍या दोन्ही डावात पाच बळी घेणारे भारतीय गोलंदाज

बिशन सिंग बेदी ( पर्थ, ऑस्ट्रेलिया) १९७७
भागवत चंद्रशेखर (मेलबर्न, ऑस्ट्रेलिया) १९७७
व्यंकटेश प्रसाद ( डर्बन, दक्षिण आफ्रिका ) १९९६
इरफान पठाण (ढाका, बांगलादेश) २००४
इरफान पठाण ( हरारे झिम्बाब्वे) २००५
रविचंद्रन अश्विन ( रोसो, वेस्ट इंडिज) २०२३

 

हेही वाचा : 

 

 

Back to top button