पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि बांगलादेश महिला टी-20 मालिकेत भारताने अखेरच्या षटकात थरारक विजय मिळवला. या विजयाची शिल्पकार शेफाली वर्मा ठरली. तिने अखेरच्या षटकामध्ये ३ बळी घेतले. मालिकेतील सलग दुसरा विजय मिळवत टीम इंडियाने टी-२० मालिका आपल्या नावावर केली आहे. IND vs BAN )
भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेश ८७ धावांवर गारद झाला. आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशच्या निगारा सुलतानाने सर्वाधिक ३८ धावांची खेळी केली. तर भारताकडून दिप्ती शर्मा आणि शेफाली वर्मा यांनी प्रत्येकी ३ विकेट घेत संघाला विजयात माेलाचा वाटा उचलला.
बांगलादेशने भारताला २० षटकांत ८ गडी बाद करत अवघ्या ९५ धावांवर रोखले. बांगलादेशच्या गोलंदाजांच्या अचुक माऱ्यापुढे भारताचा डाव गडगडला. सलामीवीर स्मृती मानधना १३, शेफाली वर्मा १९ आणि जेमिमाह रॉड्रिग्स ८ धावा करून तंबूत परतल्या. मालिकेतील पहिल्या सामन्यात अर्धशतकी खेळी केलेली कर्णधार हरमनप्रीत कौरला खातेही उघडता आले नाही. यस्तिका भाटिया ११, हरलीन देओल ६, दीप्ती शर्मा १० आणि अमनजोत कौर १४ धावांवर बाद झाली. पूजा वस्त्राकर ७ धावा करून नाबाद राहिली तर मिन्नू मणीने ५ धावांचे योगदान दिले. (IND vs BAN)
बांगलादेशच्या गोलंदाजांनी दुसऱ्या सामन्यात शानदार गोलंदाजी करत भारताला कमी धावांवर रोखले. त्यांनी केलेल्या तिखट माऱ्यापुढे भारतीय फलंदाजांना विशेष कामगिरी करता आली नाही. गोलंदाजीमध्ये सुलताना खातूनने सर्वाधिक तीन बळी घेतले. तर फहिमा खातूनने दोन विकेट घेतल्या. मारुफा अख्तर, नाहिदा अख्तर आणि राबेया खान यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
हेही वाचा :