Ashes Harry Brook : तिसऱ्या अॅशेस सामन्यात हॅरी ब्रुकने केला 'हा' विक्रम | पुढारी

Ashes Harry Brook : तिसऱ्या अॅशेस सामन्यात हॅरी ब्रुकने केला 'हा' विक्रम

पुढारी ऑनलाईन डेस्क :  अॅशेसच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात हॅरी ब्रुकने केलेल्या ७५ धावांच्या खेळीमुळे इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर ३ विकेट राखून विजय मिळवला. यासह हॅरी ब्रुकने दुसऱ्या डावात इतिहास रचला. ब्रुकने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूंमध्ये १०० धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. (Ashes Harry Brook)

इंग्लंडने अॅशेसच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवला. सामन्यात हॅरी ब्रुकने अर्धशतकी खेळी केली. या खेळीमुळे त्याने कसोटी क्रिकेटचा एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. हॅरी ब्रुक आता कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडू खेळून १००० धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम कॉलिन डी ग्रँडहोमच्या नावावर होता. (Ashes Harry Brook)

हॅरी ब्रूक पहिल्या क्रमांकावर

इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रुक कमी चेंडूत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद १००० धावा करणारा फलंदाज ठरला आहे.  हॅरी ब्रुकने १०५८ चेंडू खेळून कसोटी क्रिकेटमधील हा विक्रम आपल्या नावे केला आहे. यापूर्वी हा विक्रम डी ग्रँडहोमच्या नावावर होता. डी ग्रँडहोमने ११४० चेंडूत ही कामगिरी केली

कसोटी क्रिकेटमध्ये कमी चेंडूत १००० धावा करणारे खेळाडू

हॅरी ब्रुक- १०५८ चेंडू
डी ग्रँडहोम – ११४० चेंडू
टीम साऊदी – ११६७ चेंडू

या यादीत हॅरी ब्रुक पहिल्या क्रमांकावर आला आहे. दुसरीकडे, कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडू खेळून १००० धावा पूर्ण करण्याच्या बाबतीत टीम साऊथी तिसऱ्या क्रमांकावर आहे, त्याने ११६७ चेंडू खेळून १००० धावा पूर्ण केल्या आहेत.

हेही वाचा;

Back to top button