IND vs WI : विंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीपूर्वी टीम इंडियाच्या चिंतेत वाढ | पुढारी

IND vs WI : विंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीपूर्वी टीम इंडियाच्या चिंतेत वाढ

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. दि. १२ जुलैपासून वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळणार आहे. आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना भारतीय कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे. मात्र पहिल्या सामन्यापूर्वीच टीम इंडियाचे टेन्शन वाढले आहे. (IND vs WI)

वेस्ट इंडिजच्या दौऱ्यासाठी टीम इंडियाने संघात तीन फिरकीपटूंचा समावेश केला आहे. यामुळे संघात कोणत्या फिरकीपटूला स्थान मिळणार आणि कोणाला बाकावर बसवले जाणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. यातून कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यातून कसा मार्ग काढतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (IND vs WI)

‘या’ तीन फिरकीपटूंचा संघात समावेश

वेस्ट इंडिज मालिकेसाठी रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांना संघात संधी मिळाली आहे. यापैकी अश्विन आणि जडेजा या जोडीने टीम इंडियासाठी अनेक सामने जिंकले आहेत. तर अक्षर पटेलने आपली क्षमता सिद्ध केली आहे. तो कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियासाठी सर्वोत्तम फिरकीपटू आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून उदयास आला आहे.

रविचंद्रन अश्विनची गणना जगातील सर्वोत्तम फिरकीपटूंमध्ये केली जाते. चांगल्या लयीत असताना तो कोणत्याही फलंदाजीच्या आक्रमणाला फाटा देऊ शकतो. अश्विनचा कॅरम बॉल खेळणे फलंदाजासाठी सोपे नसते. याशिवाय तो खालच्या क्रमांकावर उतरून उत्कृष्ट फलंदाजी करण्यात माहिर आहे.

विंडिज विरूध्द अश्विनचे रेकॉर्ड

अश्विनच्या नावावर वेस्ट इंडिजविरुद्ध मोठा विक्रम आहे. त्याने आतापर्यंत विंडीजविरुद्धच्या ११ कसोटी सामन्यांत ४ शतकांच्या सहाय्याने ४५८ धावा केल्या आहेत. याशिवाय त्याच्या नावावर ६० विकेट्स आहेत.

प्लेइंग इलेव्हनमध्ये फिरकीपटू म्हणून दुसऱ्या स्थानासाठी रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांच्यात भिडत होईल. दोन्ही खेळाडू चांगले फिरकीपटूसह ते चांगली फलंदाजी ही करतात. अष्टपैलू जडेजाने बॉर्डर-गावसकर करंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्धचे पहिले दोन सामने टीम इंडियाला एकहाती जिंकून दिले होते.

फलंदाजी आणि गोलंदाजीसोबतच तो क्षेत्ररक्षणातही उत्तम आहे. त्याने भारताकडून आतापर्यंत ६५ कसोटी सामन्यांमध्ये २६८ विकेट्स घेतल्या आहेत. तर फलंदाजीमध्ये २७०६ धावा केल्या आहेत.

वेस्ट इंडिज मालिकेसाठी भारतीय कसोटी संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, आर जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.

हेही वाचा;

Back to top button