President Draupadi Murmu :राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या गडचिरोली दौऱ्याची जय्यत तयारी | पुढारी

President Draupadi Murmu :राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या गडचिरोली दौऱ्याची जय्यत तयारी

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu)  बुधवारी (दि. ५) गडचिरोली दौऱ्यावर येणार आहेत. गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला त्या मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

बुधवारी सकाळी साडेदहा ते साडेअकरा वाजेपर्यंत श्रीमती मुर्मू (President Draupadi Murmu)  गोंडवाना विद्यापीठाच्या कार्यक्रमात उपस्थित राहतील. याप्रसंगी राष्ट्रपतींच्या हस्ते विविध विद्या शाखांच्या परीक्षेत सुवर्ण पदक पटकावलेल्या ६ विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात येईल. शिवाय विद्यापीठाच्या नवीन परिसरातील कोनशिलेचे अनावरणही राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे.

राष्ट्रपतींच्या कार्यक्रमासाठी गोंडवाना विद्यापीठ परिसरात एक हजार नागरिक बसतील, असा वातानुकूलीत बंद शामियाना उभारण्यात आला आहे. विद्यापीठाच्या शेजारीच असलेल्या औद्यागिक वसाहत परिसरात तीन हेलिपॅड उभारण्यात आली आहेत. चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावीत, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री धर्मरावबाबा आत्राम उपस्थित राहणार असल्याचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी सांगितले.

हेही वाचा 

Back to top button