WC 2023 IND vs PAK : तर भारत विरुद्ध पाकिस्तान दुसरा महामुकाबला ‘ईडन गार्डन’वर रंगणार!

WC 2023 IND vs PAK : तर भारत विरुद्ध पाकिस्तान दुसरा महामुकाबला ‘ईडन गार्डन’वर रंगणार!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : WC 2023 IND vs PAK : आयसीसीने क्रिकेट विश्वचषक 2023 चे वेळापत्रक जाहीर केले आहे, परंतु उपांत्य फेरीच्या सामन्यांबाबत जर-तरची स्थिती ठेवली आहे. आयसीसी आणि बीसीसीआयने संयुक्तपणे निर्णय घेत उपांत्य फेरीचा एक सामना मुंबईत आणि दुसरा सामना कोलकाता येथे खेळवला जाईल. मात्र, त्यात जर-तरची अटही ठेवण्यात आली आहे.

10 संघांची ही स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने आयोजित केली जाणार आहे. म्हणजेच साखळी टप्प्यात प्रत्येक संघ एकमेकांशी सामने खेळतील. प्रत्येक संघ 9-9 सामने खेळेल. उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. (WC 2023 IND vs PAK)

वेळापत्रक जाहीर करताना आयसीसीने म्हटले आहे की, भारताने उपांत्य फेरी गाठली तर हा सामना वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाईल. मात्र, पाकिस्तानने उपांत्य फेरीत प्रवेश केल्यास त्यांचा सामना कोलकाता येथील ईडन गार्डन स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. अशातच भारत विरुद्ध पाकिस्तान उपांत्य फेरीत पुन्हा आमनेसामने आल्यास हा सामना ईडन गार्डन स्टेडियमवर होईल. 2011 च्या विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात उपांत्य फेरीत सामना झाला होता. हा सामना पंजाबमधील मोहाली येथे झाला. यावेळी मोहालीत एकही सामना होणार नाही. (WC 2023 IND vs PAK)

आणखी वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news