MPL 2023 : कोल्हापूर दुसर्‍या स्थानी | पुढारी

MPL 2023 : कोल्हापूर दुसर्‍या स्थानी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) वतीने आयोजित श्रीराम कॅपिटल महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत दहाव्या दिवशी अखेरचा साखळी सामना नाट्यपूर्ण ठरला. मनोज यादवने (4-6) केलेली हॅट्ट्रिक आणि नंतर अंकित बावणेने सलग एकाच षटकात सलग सहा चौकारासंह नाबाद 62 धावांची केलेली खेळी पाहायला मिळाली. त्यांच्या कामगिरीच्या जोरावर कोल्हापूर टस्कर्स संघाने ईगल नाशिक टायटन्स संघावर 9 गडी राखून विजय मिळवत दुसर्‍या स्थानी झेप घेतली आहे. (MPL 2023)

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहूंजे येथील स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत नाशिकच्या सिMPL 202द्धेश वीरने सुरुवातीला 25 चेंडूंत 2 चौकार व 2 षटकारांसह 34 धावा, तर मंदार भंडारीने 12 चेंडूंत 3 चौकार व 2 षटकारांसह 27 धावा केल्या. मनोजने पहिल्याच चेंडूवर कौशल तांबेला उत्तुंग फटका मारताना झेल बाद केले. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या ऋषभ कारवाने एक धाव घेतली; पण तिसर्‍याच चेंडूवर सलामवीर सिद्धेश वीरला त्रिफळा बाद झाला. चौथ्या चेंडूवर आदित्य राजहंसदेखील त्रिफळा बाद झाला, तर पुढच्याच चेंडूवर प्रशांत सोळंकीला झेल बाद करून मनोज यादवने स्पर्धेतील पहिली हॅट्ट्रिक नोंदवली. विशेष म्हणजे, शेवटच्या चेंडूंवर साहिल औताडेने धावबाद करून एकाच षटकात चार गडी बाद, एक धावचीत अशा अनोख्या कामगिरीची नोंद केली. (MPL 2023)

कोल्हापूर टस्कर्स संघाने 89 धावांचे आव्हान 9 षटकांत 1 बाद 92 धावा करून पूर्ण केले. अंकित 6 धावांवर खेळत असताना चौफेर चौकारांची आतषबाजी केली. त्याने नाशिकचा फिरकीपटू प्रशांत सोळंकीला त्याच्या पहिल्याच षटकात 6 चेंडूंत सलग 6 चौकार मारले. यंदाच्या एमपीएलमधील अशी कामगिरी करणारा अंकित पहिलाच खेळाडू ठरला. अंकित व केदार जाधव यांनी 19 चेंडूंत 37 धावांची धडाकेबाज सलामी दिली. केदार जाधव 7 धावांवर बाद झाला. त्यानंतर अंकित बावणेने 26 चेंडूंत 11 चौकारांसह नाबाद 62 धावांची तुफानी खेळी करत संघाला एकहाती विजय मिळवून दिला. अंकितला नौशाद शेखने नाबाद 20 धावा काढून त्याला साथ दिली. या जोडीने दुसर्‍या गड्यासाठी 35 चेंडूंत 55 धावांची भागीदारी केली.

हेही वाचा;

Back to top button