कोल्हापूर : उद्योजक संतोष शिंदे मृत्यूप्रकरणी दोघे ताब्यात; विजापुरात कारवाई | पुढारी

कोल्हापूर : उद्योजक संतोष शिंदे मृत्यूप्रकरणी दोघे ताब्यात; विजापुरात कारवाई

गडहिंग्लज ः पुढारी वृत्तसेवा येथील उद्योजक संतोष शिंदे यांना बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवून त्यांच्याकडून १ कोटीची खंडणी मागितल्यामुळे तसेच पुण्यातील दोघांनी ६.५० कोटी रुपयांची फसवणूक केल्याने या दोन्ही त्रासातून मुक्त होण्यासाठी पत्नी व मुलाला संपवून शिंदे यांनी स्वतः जीवन संपवले. याप्रकरणी माजी नगरसेविका, पोलिस अधिकारी राहुल राऊत, विशाल बाणेकर, संकेत पाटे यांच्याविरोधात जीवन संपवण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले होते.

रविवारी दिवसभर पोलिसांची दोन पथके या आरोपींच्या मागावर होती. यातील सर्वच आरोपींना मोबाईल टॉवरद्वारे शोधण्यात पोलिसांना यश आले. यातील माजी नगरसेविकेसह राऊत याला पोलिसांनी विजापुरातून ताब्यात घेतले आहे. सोमवारी त्यांना अटक दाखवण्यात येईल. दरम्यान शनिवारी रात्री उशिरा तीनही मृतदेहांवर नदीवेस येथील स्मशानभूमीत मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेही वाचंलत का?

Back to top button