Shubman Gill : विंडीजविरुद्धच्या टी-20 मालिकेतून गिल बाहेर?

Shubman Gill : विंडीजविरुद्धच्या टी-20 मालिकेतून गिल बाहेर?
Published on
Updated on

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : वेस्ट इंडिज मालिकेत शुभमन गिल कसोटी आणि एकदिवसीय फॉरमॅटमध्ये खेळताना दिसणार आहे. पण, आगामी आशिया चषक आणि विश्वचषक स्पर्धा लक्षात घेता गिलवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी त्याला विंडीजविरुद्धच्या टी-20 मालिकेदरम्यान विश्रांती दिली जाऊ शकते. गिलच्या अनुपस्थितीत ऋतुराज गायकवाडला डावाची सुरुवात करण्याची संधी मिळू शकते. (Shubman Gill)

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर टीम इंडिया आता वेस्ट इंडिज दौर्‍याने नव्या पर्वाची सुरुवात करणार आहे. भारतीय संघाला वेस्ट इंडिज दौर्‍यावर 2 कसोटी, 3 वन डे आणि 5 टी-20 सामने खेळायचे आहेत. टी-20 मालिकेत पुन्हा एकदा हार्दिक पंड्याकडे कर्णधारपद सोपवले जाऊ शकते. त्याचबरोबर या मालिकेसाठी संघामध्ये युवा खेळाडूंचा भरणा करण्याकडे निवड समितीचा कल असेल. या टी-20 मालिकेत शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल डावाची सुरुवात करताना दिसतील, अशी अपेक्षा होती. (Shubman Gill)

यंदाच्या आयपीएलमध्ये सीएसकेसाठी सलामी देताना गायकवाडने चमकदार कामगिरी केली. आशिया चषक, विश्वचषक आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका अशा मोठ्या स्पर्धा तोंडावर असल्याने बीसीसीआय काही प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्याची योजना आखत आहे. ज्यामुळे बेंच स्ट्रेंथ आजमावण्याचा प्रयत्न केला जाईल. निवड समिती जुलैच्या पहिल्या आठवड्यात वेस्ट इंडिज मालिकेसाठी खेळाडूंची निवड जाहीर करण्याची शक्यता आहे.

इशान किशनही असू शकतो स्पर्धक

ऋतुराज गायकवाड व्यतिरिक्त इशान किशन हादेखील सलामीचा प्रबळ दावेदार आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये इशानने अनेक वेळा संघासाठी सलामी फलंदाज म्हणून भूमिका बजावली आहे. दुसरीकडे, ऋतुराजला उर्वरित खेळाडूंएवढ्या संधी मिळालेल्या नाहीत. अशातच त्याला यंदाही बाहेर बसवणार की संधी दिली जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. टीम इंडियाला मागील वर्षी टी-20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होत, तेव्हापासून निवडकर्त्यांनी टी-20 फॉरमॅटच्या संघातून रोहित शर्मा, विराट कोहली, के.एल. राहुल यांसारख्या मोठ्या खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यांच्याऐवजी तरुणांना खेळण्याची संधी दिली आहे.

हेही वाचा;

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news