Wrestling Federation of India : कुस्ती महासंघाची निवडणूक लांबणीवर

Wrestling Federation of India : कुस्ती महासंघाची निवडणूक लांबणीवर

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीसाठी मतदारयादी तयार करण्याची मुदत दोन दिवस पुढे ढकलण्यात आलेली आहे. पाच राज्य संघटनांच्या मतदारांसंदर्भात संभ्रमावस्था असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असून, भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) या संदर्भात निर्णय घेण्यासाठी पाचही राज्य संघटनाच्या प्रतिनिधींना 21 जून रोजी चौकशीसाठी पाचारण केले आहे. (Wrestling Federation of India)

राज्य संघटनांना दोन व्यक्तींची नावे कळविण्यासाठी दिलेली मुदत सोमवारी संपुष्टात आली. मात्र महाराष्ट्रासह, तेलंगणा, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि राजस्थान या पाच संघटनांच्या अस्तित्वावरून वादाची आडकाठी निर्माण झाली आहे. (Wrestling Federation of India)

महासंघाच्या आधीच्या कार्यकारिणीने या पाचही राज्य संघटनांचे संलग्नत्व काढून घेत तेथे हंगामी समितीची नियुक्ती केली होती. या हंगामी समितीबरोबरच संलग्नत्व काढून घेतलेल्या संघटनेने देखील आपली नावे पाठवल्यामुळे आता मतदानाचा अधिकार नेमका कुणाला, हा प्रश्न निर्माण झाला. यासाठी या संघटनांच्या चौकशीचा निर्णय घेण्यात आला आणि नावे कळवण्याची मुदतही दोन दिवस म्हणजे बुधवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली.

महाराष्ट्र संघटनेतही वाद

अंतर्गत वर्चस्वाच्या लढाईत भारतीय कुस्ती महासंघाने सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त केली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील राज्य कुस्तीगीर परिषदेने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयातील लढाई राज्य कुस्तीगीर परिषदेने जिंकली. राज्य कुस्तीगीर परिषद हीच खरी असल्याचा न्यायालयाने निकाल दिला. पण त्यानंतर अंतर्गत चौकशीचे कारण देत आधीच्या कार्यकारिणीने संलग्नत्व रद्द केल्याचे सांगत हंगामी समिती कायम ठेवली. आता मतदानासाठी दोघांकडून नावे पाठविण्यात आली आहेत.

हेही वाचा; 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news