दि. २१ जून. हा दिवस 'आंतरराष्ट्रीय योग दिवस' (International Yoga Day) म्हणून जगभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने संयुक्त राष्ट्राने या दिवसाला मान्यता दिली. उत्तम शरीर व मानसिक स्वास्थ्य या दोन्ही आजच्या धावत्या युगात अत्यंत आवश्यक असलेल्या गोष्टी. हजारो वर्षांपूर्वीपासून भारतात आत्मोन्नतीसाठी योगशास्त्र अभ्यासिले जाते. योग या शब्दाची व्याप्ती फार मोठी आहे, ज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग, राजयोग, तंत्रयोग, अष्टांगयोग आदि अनेक शाखांचा 'योग' या शब्दात अंतर्भाव होतो. या सर्व शाखा म्हणजे मूलतः एकमेकात मिसळलेले प्रवाह आहेत. (International Yoga Day 2023)
आज आपल्या देशात तसेच विदेशात लोकप्रिय असलेले योगशास्त्र म्हणजे अष्टांगयोग ' वा 'हठयोग ' हे होय. अष्टांगयोगात मानसिक व शारीरिक स्वास्थ्याचे संवर्धन करण्यासाठी अभ्यासली जाणारी चार अंगे ही आहेत १. यम, २ नियम, ३. आसन व ४. प्राणायाम 'यम' म्हणजे समाजात असताना पाळावयाचे नियम, 'नियम' म्हणजे वैयक्तिक विकासाकरिता पाळावयाची बंधने, यम आणि नियमांचे योग्य पालन केल्याने योगाभ्यासासाठी शारीरिक व मानसिक तयारी होते. आसन म्हणजे शरीराची स्थिती. आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या ह्या अंगात मुद्रा व बंधसुद्धा येतात. ' आसनानि समस्तानि यावन्तो जीवजन्तवः म्हणजेच जितके जीवजंतू तितकी आसने. 'प्राणायाम ' म्हणजे ' श्वासप्रश्वासयोर्गतिविच्छेद:' अर्थात् श्वास आणि प्रश्वास यांच्यामधील अंतर लांबविणे. प्राणायामाने शरीरशुद्धी व नाडीशुद्धी होते. आसनांनी सिद्ध झालेले शरीर प्राणायामाने अधिक शुद्ध करता येते. (International Yoga Day 2023)
योगा आणि ध्यान :- ध्यान तशी एक लगेच न उमजणारी प्रकिया आहे आणि सुरूवातीला ती खूप कठीण वाटते. व्यक्तीने स्वतःहून रस घेतल्याशिवाय ध्यानधारणा होत नाही. सुरुवाती-सुरुवातीला ती खूप क्लिष्ट वाटते. पण, आपल्या दैनंदिन जीवनातील मागण्यांपासून जाणीवपूर्वक थोडा वेळ बाजूला काढून ध्यानात आपले मन स्वच्छता व सक्षम करणे हे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. मानसिक आरोग्य सर्वसामान्यपणे सकारात्मक मानले जाते. किंबहुना, आज सकारात्मक मानसिक आरोग्य ही संकल्पना जगभर प्रचलित आहे. एखादी व्यक्ती योगाच्या अनुभूतीने मानसिक आरोग्याचा उच्च पातळीपर्यंत पोहोचू शकते.
योगा आणि ध्यान चे फायदे :- जेव्हा आपण योग करतो तेव्हा आपल्या मेंदूतील असंख्य पेशी नवनवीन 'कनेक्शन' विकसित करतात. मेंदूच्या संरचनेत तसेच त्याच्या कार्यामध्ये बदल घडवतात, ज्यामुळे मेंदूची संज्ञानात्मक कौशल्ये सुधारतात; जसे की, नवीन गोष्टी शिकणे वा स्मरणशक्ती सक्षम होणे, साहजिकच मेंदूतील विश्लेषणात्मक वा स्मरणशक्तीशी निगडित असलेले भाग मजबूत होतात, जे लोक नियमित योग, प्राणायाम वा ध्यानधारणा करतात, त्यांच्या मोठा मेंदूचा भाग उदा. 'हिप्पोकॅम्पस योग' न करणार्या व्यक्तीपेक्षा जास्त विकसित झालेले आढळतात. वृद्धामध्ये नैराश्य आणि चिंता यासारख्या मानसिक रोगांवर योगाच्या अभ्यासाने आराम मिळू शकतो आणि हा आराम दीर्घकाळ टिकून राहिलेला दिसतो. एकंदरीत योगाच्या अभ्यासाने लवचिक शरीराबरोबर लवचिक मनाचा लाभ होतो, ज्यामुळे मानसिक आरोग्य सक्षम बनते.
योग आणि शाररिक स्वास्थ :- शरीराची लवचिकता वाढविणे, सांधे-अस्थिबंधन यांना मजबूत करणे, वजन नियंत्रणात ठेवणे, शरीराची उत्तम देखरेख व मन यामध्ये उल्लेखनीय सामंजस्य साध्य करणे शक्य आहे. योगाचे उच्चतम उद्दिष्ट हे आत्मसाक्षात्कार मिळवण्यासाठी आहे, ज्ञानाप्राप्ती आहे. ही संकल्पना जरी गूढ भासत असली, तरी योगी हे करताना अनेक दिवस वा आठवडे त्यांना ध्यान करावे लागते. यासाठी जबरदस्त शारीरिक आरोग्य, ऊर्जा आणि स्वत:ला कणखरपणे टिकवून ठेवण्याची क्षमता गरजेची असते.
योग आणि मानसिक स्वास्थ :- योगामुळे एखाद्या व्यक्तीला आपल्या तणावाचे नियोजन करता येते. तणावामुळे शरीरावर पाठीच्या समस्या, डोकेदुखी, निद्रानाश, व्यसनाची सवय आणि मनाची चलबिचल होत असते. याशिवाय तणावामुळे आधुनिक काळातील जीवनशैलीविषयक समस्या आपण आज अनेक पटीने वाढलेल्या पाहतो. ध्यान व प्राणायामाचा समावेश करून व्यक्तीचे मानसिक आरोग्य सुधारता येणे शक्य आहे. प्राचीन काळापासून ध्यानाचा उपयोग तणावाचा सामना करण्यासाठी आणि आरोग्य सक्षम सजगता प्राप्त करण्यासाठी आणि आरोग्य सक्षम करण्यासाठी केला गेला आहे. यासाठी आज जागतिक पातळीवर संशोधन करत अनेक पुरावे सादर केले जात आहेत.
–
हेही वाचा