Babita Phogat : तुम्ही काँग्रेसच्या हातातील बाहुले..! : बबिता फोगट | पुढारी

Babita Phogat : तुम्ही काँग्रेसच्या हातातील बाहुले..! : बबिता फोगट

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात निदर्शने करण्यावरून कुस्तीपटूंमध्ये दुफळी माजली असून शनिवारी ऑलिम्पिक पदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिकने केलेल्या टीकेला रविवारी कुस्तीपटू बबिता फोगट हिने उत्तर दिले आहे. हे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित असून तुम्ही काँग्रेसच्या हातातील बाहुले बनला आहात हे देशातील जनतेला समजले आहे. आता वेळ आली आहे की तुम्ही तुमचा खरा हेतू सांगावा, कारण आता जनता तुम्हाला प्रश्न विचारत आहे, अशी तोफ बबिताने डागली आहे. (Babita Phogat)

भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणाशी संबंधित साक्षी मलिक आणि भाजप नेत्या बबिता फोगट यांच्यातील ट्विटर युद्ध रंगले आहे. (Babita Phogat)

ऑलिम्पिक पदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिक आणि तिचा पती सत्यव्रत कादियान यांनी नुकतेच व्हिडीओद्वारे सांगितले होते की, बबिता फोगटने जंतरमंतर पोलिस ठाण्यातून परफॉर्म करण्याची परवानगी घेतली होती. मात्र, आता बबिताने या प्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे. बबिताने सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. (Babita Phogat)

बबिता फोगटने तिच्या अधिकृत ट्विटर हँडलवर लिहिले, काल जेव्हा मी माझ्या ‘धाकट्या बहिणी’चा आणि तिच्या नवर्‍याचा व्हिडीओ पाहत होतो तेव्हा मला खूप वाईट वाटले आणि हसले, सर्वप्रथम मी हे स्पष्ट करते की लहान बहिणीला दाखवलेला परवानगीचा कागद नाही. त्यावर कोठेही माझ्या स्वाक्षरीचा किंवा माझ्या संमतीचा पुरावा किंवा मला त्याच्याशी दूरस्थपणे काहीही देणेघेणे नाही. मी पहिल्या दिवसापासून सांगत आलो आहे की, देशाच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवा, सत्य नक्कीच बाहेर येईल.

बबिता फोगटने पुढे लिहिले की, एक महिला खेळाडू म्हणून मी नेहमीच देशातील सर्व खेळाडूंसोबत होते, सोबत आहे आणि सोबत राहीन, पण विरोध सुरू झाल्यापासून मी या गोष्टीच्या बाजूने नव्हते, मी सर्व पैलवानांना वारंवार सांगितले की, तुम्ही पंतप्रधान किंवा गृहमंत्र्यांना भेटा, तिथूनच तोडगा निघेल, पण तुम्ही काँग्रेस पक्ष आणि प्रियांका गांधी त्यांच्यासोबत जाता जे स्वत: आरोपी आहेत, पण देशातील जनतेने आता या विरोधकांचे चेहरे ओळखले आहेत. तुमच्या भावनांच्या आगीत त्यांनी आपल्या राजकारणाची भाकरी भाजण्याचे काम केले.

तुम्ही बदामाच्या पिठाची रोटी खात असाल, पण मी आणि माझ्या देशातील लोकही गव्हाची रोटी खातो, हे सर्वांना समजते. तुम्ही काँग्रेसच्या हातातील बाहुले बनला आहात हे देशातील जनतेला समजले आहे. आता वेळ आली आहे की तुम्ही तुमचा खरा हेतू सांगावा. कारण आता जनता तुम्हाला प्रश्न विचारत आहे.

– बबिता फोगट

हेही वाचा;

Back to top button