पुढारी ऑनलाईन डेस्क : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अॅशेसचा पहिला कसोटी खेळला जात आहे. आज (दि.१८) सामन्याच्या तिसरा दिवस आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी ) आज एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये म्हटलं आहे की, इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी दोषी आढळला आहे. त्याच्या सामना मानधनातून (मॅच फी ) २५ टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. (Moeen Ali Fined)
मोईन अली अॅशेस सामन्या दरम्यान आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन करताना दोषी आढळला. त्याची एका कसोटी सामन्याची फी सुमारे १५ लाख आहे. २५ टक्के दंड म्हणजे त्याला ३.७५ लाख रुपये दंड भरावा लागणार आहे. मोईन अली हा अनुच्छेद २.२० चे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळला असल्याचे आयसीसीने स्पष्ट केले आहे. (Moeen Ali Fined )
पहिल्या कसोटीतील दुसरा दिवशी पहिल्या डावाच्या मोईन अली क्षेत्ररक्षण करत हाेता. यावेळी सीमारेषेवर हातावर 'ड्रायिंग एजंट' ( हात काेरडा ठेवण्यासाठी लावण्यात येणारे जेल) लावताना दिसला होता. त्याने हा चूक कबूल केली आहे. यामुळे ICC एलिट पॅनेल ऑफ मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांनी त्याला दंडाची शिक्षा सुनावली. माेईन अलीने स्वत: चूक कबुल केल्यामुळे औपचारिक सुनावणीची गरज भासली नाही.
हेही वाचा;