Indonesia Open 2023 : चिराग-सात्विक जोडी चॅम्‍पियन, ‘अशी’ कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय जोडी

इंडोनेशिया ओपन पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत भारताच्या सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी बाजी मारली.
इंडोनेशिया ओपन पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत भारताच्या सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी बाजी मारली.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इंडोनेशिया ओपन पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत भारताच्या सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी बाजी मारली. या जोडीने मलेशियाच्या आरोन चिया आणि सू वू यिक या जोडीचा ४३ मिनिटांमध्‍ये २१-१७, २१-१८ असा विजय नोंदवला. ( Indonesia Open 2023)

भारतीय जोडीने अंतिम सामन्‍यातसुरुवातीपासूनच वर्चस्व राखले. पहिला सेट २१-१७ असा जिंकला. त्याचवेळी सात्विक-चिराग जोडीने दुसरा सेट २१-१८ अशा फरकाने जिंकून इतिहास रचला. गेल्या एका वर्षात हे दोघेही भारताच्या सर्वात यशस्वी खेळाडूंमध्ये गणले गेले आहेत.

इंडोनेशिया ओपन वर्ल्ड टूर सुपर 1000 पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी दक्षिण कोरियाच्या मिन ह्युक कांग आणि सेउंग जे सेओ यांचा 17-21, 21-19, 21-18 असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली होती. उपांत्‍य फेरीच्‍या तुलनेत अंतिम फेरीत तुलनेने सहज विजय मिळवला.

 Indonesia Open 2023 : अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय जोडी

चिया आणि वुयी यिक यांच्यावर सरळ गेममध्ये विजय मिळवल्यानंतर सत्वकी आणि चिराग ही BWF 1000 स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय जोडी ठरली. गेल्या वर्षी सुपर-750 फ्रेंच ओपनचे विजेतेपद जिंकणारी सात्विक-चिराग ही पहिली भारतीय जोडी ठरली. जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर असलेल्या सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या पुरुष दुहेरी जोडीने बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकले आहे.

अशी असते बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन 'वर्ल्ड टूर' विभागणी

बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन (BWF) वर्ल्ड टूर सहा स्तरांमध्ये विभागली गेली आहे. वर्ल्ड टूर फायनल्स, चार सुपर 1000, सहा सुपर 750, सात सुपर 500 आणि 11 सुपर 300. तसेच BWF टूर सुपर 100 स्तर, रँकिंग गुण देखील प्रदान करते. यातील प्रत्येक स्पर्धा वेगवेगळे रँकिंग गुण आणि बक्षीस रक्कम देते. सुपर 1000 स्तरावर सर्वोच्च गुण आणि बक्षीस आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news