Team India : एक जागा आणि विकेटकिपर 4! ODI वर्ल्डकपसाठी भारत कोणाला संधी देणार? | पुढारी

Team India : एक जागा आणि विकेटकिपर 4! ODI वर्ल्डकपसाठी भारत कोणाला संधी देणार?

पुढारी ऑनलाईन डेस्क : Team India ODI World Cup 2023 : भारताने 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली, तर 2007, 2011 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली अनुक्रमे टी-20 आणि एकदिवसीय विश्वचषक ट्रॉफी जिंकली. पण गेल्या 10 वर्षात टीम इंडियाला आयसीसीचे एकही विजेतेपद आपल्या नावावर करता आलेले नाही. अगामी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणार आहे. टीम इंडिया हा विश्वचषक जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. या स्पर्धेसाठी, चार खेळाडूंना यष्टिरक्षक म्हणून संघात स्थान मिळण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. मात्र या चार खेळाडूंपैकी एकालाच संधी मिळू शकते.

1. ऋषभ पंत

महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीनंतर ऋषभ पंतने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये विकेटकीपिंगची जबाबदारी स्वीकारली. त्याच्या बॅटमधूनही अनेक शानदार खेळी पाहायला मिळाल्या. मात्र गेल्या वर्षी दिल्लीहून रुरकीला जात असताना त्यांच्या कारला अपघात झाला. त्यानंतर त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. तो हळूहळू बरा होत आहे. पण वनडे वर्ल्ड कपपर्यंत तो तंदुरुस्त राहू शकतो की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्याने टीम इंडियासाठी 30 एकदिवसीय सामन्यांमध्ये 1 शतकासह 865 धावा केल्या आहेत. (Team India ODI World Cup 2023)

2. केएल राहुल

ऋषभ पंत जखमी झाल्यानंतर केएल राहुल वनडे फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा यष्टिरक्षक बनला. त्याचवेळी शुभमन गिलने सलामी देताना चमकदार कामगिरी केल्याने राहुलला फलंदाजीसाठी मधल्या फळीत पाठवण्यात आले आणि त्याचे स्थान निश्चित केले. पण आयपीएल 2023 मध्ये केएल राहुल जखमी झाला. या कारणामुळे तो आयपीएल 2023 आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधून बाहेर पडला. मात्र पुनर्वसनासाठी तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पोहोचला आहे. त्याच्याकडे अनुभव आहे, जो टीम इंडियासाठी उपयुक्त ठरू शकतो. जर पंत एकदिवसीय विश्वचषकापर्यंत तंदुरुस्त नसेल तर राहुल एकदिवसीय विश्वचषकात टीम इंडियासाठी विकेटच्या मागे दिसू शकतो. त्याने टीम इंडियासाठी 54 एकदिवसीय सामन्यांमध्ये 5 शतकांसह 1986 धावा केल्या आहेत. (Team India ODI World Cup 2023)

3. संजू सॅमसन

जेव्हा-जेव्हा संजू सॅमसनला टीम इंडियात संधी मिळाली. त्याला मिळालेल्या संधीचा फायदा उठवता आला नाही. त्याने बर्‍याच प्रसंगी नक्कीच प्रभावित केले, परंतु त्याला आपल्या फलंदाजीने नवीन बेंचमार्क प्रस्थापित करता आला नाही. त्याने सध्या भारतीय संघासाठी 11 एकदिवसीय सामन्यांमध्ये 330 धावा केल्या आहेत.

4. इशान किशन

इशान किशनने आयपीएल 2023 मध्ये चमकदार कामगिरी केली आणि विकेट्स राखताना अनेक नेत्रदीपक झेल घेतले. ईशानची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तो टीम इंडियामध्ये कोणत्याही फलंदाजी क्रमाने खेळू शकतो. त्याने भारतीय संघासाठी 14 एकदिवसीय सामन्यांमध्ये 510 धावा केल्या आहेत ज्यात एका द्विशतकाचा समावेश आहे. (Team India ODI World Cup 2023)

Back to top button