Team India Asia Cup : आशिया चषकातून सूर्यकुमार यादवला डच्चू मिळण्याची शक्यता

Team India Asia Cup : आशिया चषकातून सूर्यकुमार यादवला डच्चू मिळण्याची शक्यता

पुढारी ऑनलाईन डेस्क : Team India Asia Cup : भारतीय संघ पुढच्या महिन्यात विंडिज दौ-यावर जाणार आहे. महिन्याभराच्या या दौ-यानंतर वनडे आशिया कपची लगबग सुरू होईल. त्यामुळे या स्पर्धेचीही तयारी सुरू आहेच. मात्र, आशिया कपच्या आयोजनाबाबत बराच गोंधळ निर्माण झाला आहे. स्पर्धेचे यंदाचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे, पण बीसीसीआयने सुरक्षेचे कारण देत तेथे संघाला पाठवण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्याच वेळी, भारतीय संघाचे सामने श्रीलंकेत होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे बांगलादेश, अफगाणिस्तान, श्रीलंका आणि नेपाळचे संघ पाकिस्तानात खेळताना दिसतील.

श्रीलंकेने मागील वर्षी युएईमध्ये झालेला टी-20 आशिया कपचे विजेतेपद पटकावले होते. टीम इंडिया त्या स्पर्धेत सुपर फोर फेरीतून बाहेर पडली होती. त्यानंतर टी-20 विश्वचषक स्पर्धेतूनही संघाला अंतिम फेरी गाठ आली नाही, रोहितसेना सेमीफायनल खेळून मायदेशी परतली. यंदाही आयसीसी डब्ल्यूटीसीच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाने दारुण पराभव केला. त्यामुळे मोठ्या स्पर्धेच्या विजेतेपदापासून हुलकावणी मिळत असलेला भारतीय संघ आशिया चषक जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न करताना दिसेल. बीसीसीआयच्या निवड समितीने संघाची अधिकृत घोषणा अजून केलेली नाही, पण या स्पर्धेसाठी कोणाला संघात स्थान देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

असा असेल भारताचा संभाव्य 17 सदस्यीय संघ (Team India Asia Cup)

रोहित शर्मा कर्णधार असेल, तर शुभमन गिल त्याच्यासोबत सलामीवीर म्हणून दिसू शकतो. गिलने गेल्या दोन वर्षांपासून संघासाठी अनेक मॅच विनिंग इनिंग्सही खेळल्या आहेत. याशिवाय दुखापतीतून बाहेर पडणारा केएल राहुलही यष्टिरक्षक म्हणून पुनरागमन करण्यास सज्ज आहे. विराट कोहलीही संघात दिसेल. तर उपकर्णधार पदाची जबाबदारी हार्दिक पंड्याकडे सोपवली जाईल.

याशिवाय आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या संजू सॅमसनला संधी मिळण्याची शक्यता आहे. शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग हे वेगवान गोलंदाजी करताना दिसतील. सूर्यकुमार यादवला वनडे फॉरमॅटमध्ये यश मिळालेले नाही. अशा परिस्थितीत श्रेयस अय्यर तसेच व्यंकटेश अय्यरचा समावेश केला जाऊ शकतो.

यंदाची आशिया कप स्पर्धा ही 50-50 षटाकांची आहे. यात सहा संघ एकमेकांविरुद्ध राऊंड-रॉबिन फॉरमॅटमध्ये टक्कर देणार आहेत. सहा संघाची तीन-तीन अशा दोन गटांत विभागणी केली गेली आहे. भारत आणि पाकिस्तान व्यतिरिक्त नेपाळच्याला एका गटात ठेवण्यात आले आहे, तर दुसऱ्या गटात श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानचा संघ आहे.

आशिया कप 2023 साठी भारताचा संभाव्य 17 सदस्यीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), विराट कोहली, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, इशान किशन, शार्दुल ठाकूर आणि संजू सॅमसन. (Team India Asia Cup)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news