Team India WTC 2023-25 Schedule : डब्ल्यूटीसीच्या 3ऱ्या आवृत्तीत भारत खेळणार 19 सामने! ‘या’ तीन देशांचा करणार दौरा

Team India WTC 2023-25 Schedule : डब्ल्यूटीसीच्या 3ऱ्या आवृत्तीत भारत खेळणार 19 सामने! ‘या’ तीन देशांचा करणार दौरा

पुढारी ऑनलाईन डेस्क : Team India WTC 2023-25 Schedule : इंग्लंडच्या द ओव्हल मैदानावर ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले. सलग दुस-यांदा भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. डब्ल्यूटीसीची दुसरी आवृत्ती पार पडताच पुढच्या आवृतीचे वेळापत्रक आयसीसीने जाहीर केले. यानुसार भारतीय संघ 2023 ते 2025 मध्ये अंतिम फेरीपर्यंत एकूण 6 मालिका आणि 19 कसोटी सामने खेळणार आहे.

टीम इंडिया 2023-25 ​​च्या डब्ल्यूटीसी मोहिमेची सुरुवात जुलै-ऑगस्टमध्ये वेस्ट इंडिज दौ-यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेने करेल. भारतीय संघ पुढील दोन वर्षांमध्ये विदेशी भूमीवर तीन आणि देशांतर्गत तीन कसोटी मालिका खेळणार आहे. यादरम्यान भारत एकूण 19 पैकी 10 सामने मायदेशात आणि 9 सामने विदेशी भूमीवर खेळणार आहे. संघ वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा दौरा करेल. तर इंग्लंड न्यूझीलंड आणि बांगलादेशचे संघ भारतात कसोटी मालिका खेळायला येणार आहेत. (Team India WTC 2023-25 Schedule)

टीम इंडिया वर्षाच्या शेवटी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. तिथे त्यांना दोन सामन्यांची मालिका खेळायची आहे. या दौऱ्यानंतर, जानेवारी-फेब्रुवारी 2024 मध्ये इंग्लंडचा संघ भारतात दाखल होईल. उभय संघांमध्ये 5 कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. यानंतर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये बांगलादेशचा संघ भारतात 2 कसोटी खेळायला येणार आहे.

टीम इंडियाचे वेळापत्रक कसे आहे? (Team India WTC 2023-25 Schedule)

विदेशी मैदानावर : वेस्ट इंडिज विरुद्ध 2 कसोटी सामन्यांची मालिका
विदेशी मैदानावर : द. आफ्रिके विरुद्ध 2 कसोटी सामन्यांची मालिका
घरच्या मैदानावर : इंग्लंड विरुद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिका
घरच्या मैदानावर : बांगलादेश विरुद्ध 2 कसोटी सामन्यांची मालिका
घरच्या मैदानावर : न्यूझीलंड विरुद्ध 3 कसोटी सामन्यांची मालिका
विदेशी मैदानावर : ऑस्ट्रेलिया विरुद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिका

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news