Champions League : मँचेस्टर सिटी ‘चॅम्पियन’

Champions League : मँचेस्टर सिटी ‘चॅम्पियन’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : इंग्लंडमधील मँचेस्टर सिटी या फुटबॉल क्लबने शनिवारी मध्यरात्री इतिहास रचला. मिडफिल्डर रॉड्रिगो हर्नांडिझ कॅसकांटे याने 68 व्या मिनिटाला केलेल्या गोलच्या जोरावर मँचेस्टर सिटीने इटलीतील इंटर मिलान फुटबॉल क्लबवर 1-0 असा विजय मिळवून चॅम्पियन्स लीगचे (champions league) अजिंक्यपद मिळवले.

मँचेस्टर सिटीची चॅम्पियन्स लीग या युरोपमधील प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे हे पहिलेच जेतेपद ठरले. तसेच या स्पर्धेसह इंग्लिश प्रीमियर लीग व एफ. ए. करंडक अशा दोन्ही स्पर्धा जिंकण्याची किमया त्यांनी या मोसमात केली. इंग्लंडमधील मँचेस्टर युनायटेड या क्लबला असा तिहेरी धमाका करता आला होता. त्यानंतर तब्बल 24 वर्षांनंतर इंग्लंडमधील क्लबकडून संस्मरणीय कामगिरी झाली आहे, हे विशेष.

चेल्सीने 2021 मधील चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीत मँचेस्टर सिटीला पराभूत करीत दुसर्‍यांदा अजिंक्यपदाची माळ आपल्या गळ्यात घातली होती. यंदा मात्र मँचेस्टर सिटीकडून कोणतीही चूक करण्यात आली नाही. रॉड्रिगोच्या गोलनंतर इंटर मिलानकडून गोल करण्याचे प्रयत्न करण्यात आले.

तीन स्पर्धा जिंकणारे क्लब (champions league)

इंग्लंडमधील मँचेस्टर सिटी या क्लबने एका मोसमात तीन स्पर्धा जिंकत उल्लेखनीय कामगिरी केली. याआधी सेल्टीक क्लबने 1966-67 मध्ये, एजाक्सने 1971-72 मध्ये, पीएसव्हीने 1987-88 मध्ये, मँचेस्टर युनायटेडने 1998-99 मध्ये, बार्सिलोनाने 2008-09 मध्ये, इंटर मिलानने 2009-10 मध्ये, बायर्न म्युनिचने 2012-13 मध्ये, बार्सिलोनाने 2014-15 मध्ये, बायर्न म्युनिचने 2019-20 मध्ये एका मोसमात तीन स्पर्धा जिंकल्या होत्या.

हेही वाचा…

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news