Nathan Lyon : डब्ल्यूटीसी 2021-23मध्ये ‘नॅथन’ ठरला सर्वाधिक शिकार करणारा ‘लायन’! जाणून घ्या आकडेवारी

Nathan Lyon : डब्ल्यूटीसी 2021-23मध्ये ‘नॅथन’ ठरला सर्वाधिक शिकार करणारा ‘लायन’! जाणून घ्या आकडेवारी

पुढारी ऑनलाईन डेस्क : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या फायनलमध्ये दणदणीत विजय मिळवून ऑस्ट्रेलियाने ट्रॉफीवर नाव कोरले. या विजयात अनुभवी ऑफ-स्पिनर नॅथन लायनने (nathan lyon) मोलाची भूमिका बजावली. त्याने अंतिम सामन्यात भारताच्या दुसऱ्या डावात 41 धावांत 4 बळी घेत एकूण सामन्यात पाच जणांना तंबूत पाठवले. याचबरोबर तो डब्ल्यूटीसी 2021-23 च्या आवृत्तीत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला.

डब्ल्यूटीसीच्या दुसऱ्या आवृत्तीत लायनची कामगिरी कशी राहिली?

लायनने (nathan lyon) डब्ल्यूटीसीच्या दुसऱ्या आवृत्तीत 20 सामन्यांमध्ये 26.12 च्या सरासरीने आणि 2.58 च्या इकॉनॉमीने 88 बळी घेतले. विकेट घेतल्या. यादरम्यान तो पाच वेळा 5 विकेट्स आणि एका सामन्यात एकदा 10 विकेट्स घेण्यात यशस्वी झाला. डावातील त्याची सर्वोत्तम गोलंदाजी 64 धावांत 8 विकेट्स अशी आहे. लायन वगळता इतर कोणत्याही गोलंदाजाला डब्ल्यूटीसी 2021-2023 मध्ये 70 विकेट्स घेता आल्या नाहीत. दुसऱ्या स्थानावर कागिसो रबाडा आहे, ज्याने 13 सामन्यात 67 विकेट घेतल्या आहेत.

लायनने (nathan lyon) डब्ल्यूटीसीच्या दुसऱ्या आवृत्तीत सर्वाधिक पाववेळा 5 विकेट्स घेण्याची किमया केली. इतर कोणत्याही खेळाडूला 4 वेळाही 5 बळी घेता आलेले नाहीत. तर एका कसोटीत 10 किंवा त्याहून अधिक बळी घेणारा तो एकमेव ऑस्ट्रेलियन गोलंदाज आहे. भारताविरुद्धच्या इंदूर कसोटीत त्याने 99 धावांत 11 बळी घेतले होते. तर दुसऱ्या डावात त्याने 64 धावांत 8 बळी घेतले. दुसऱ्या आवृत्तीतील ही तिसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.

लायनची मायदेश आणि विदेशातील मैदानावरची कामगिरी

लायनने घरच्या मैदानावर 10 कसोटी सामने खेळले आणि 23.50 च्या सरासरीने 38 विकेट घेतल्या. यादरम्यान त्याने एकदा 5 विकेट्सही घेतल्या. केवळ रविचंद्रन अश्विन (51) आणि जेम्स अँडरसन (42) यांनी दुसऱ्या डब्ल्यूटीसीच्या दुस-या आवृत्तीत घरच्या मैदानावर लायनहून अधिक विकेट घेतल्या. लायनने विदेशी भूमीवर 9 कसोटी सामने खेळले आणि 45 विकेट घेतल्या. यादरम्यान, त्याने 4 वेळा 5 बळी घेतले. डब्ल्यूटीसी अंतिम सामना तटस्थ ठिकाणी झाला, ज्यामध्ये त्याने 5 विकेट घेतल्या.

WTC फायनलमध्ये लायनची शानदार कामगिरी

WTC अंतिम सामन्याच्या पहिल्या डावात लायनने फक्त 4 षटके टाकली आणि 19 धावांत 1 बळी घेतला. 48 धावांवर असताना त्याने रवींद्र जडेजाची विकेट घेतली. त्याने दुसऱ्या डावात सर्वोत्तम कामगिरी करत 41 धावांत 4 बळी घेतले. 35 वर्षीय खेळाडूने पाचव्या दिवशी खेळपट्टीचा पुरेपूर फायदा घेतला. त्याने 15.3 षटके टाकली आणि संपूर्ण सामन्याला कलाटणी दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news