WTC Final Oval Weather : कसोटी 'चॅम्‍पियनशिप'वर दाटले पावसाचे ढग, जाणून घ्‍या आजचे हवामान | पुढारी

WTC Final Oval Weather : कसोटी 'चॅम्‍पियनशिप'वर दाटले पावसाचे ढग, जाणून घ्‍या आजचे हवामान

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात इंग्लंडमधील ओव्हल येथे खेळला जात आहे. आज सामन्‍याचा चौथा दिवस आहे. पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारल्यामुळे ऑस्ट्रेलियाची मजबुत पकड निर्माण, झाली आहे. सामनाच्‍या चौथ्या दिवशी ओव्‍हल मैदानावर पावसाचे ढग दाटले आहेत. जाणून घेवूया आजच्‍या हवामानाविषयी…

आजचे हवामान कसे असेल?

ओव्हल मैदानावर सुरु असलेल्‍या सामन्याच्या चौथ्या आणि पाचव्या दिवशी पावसाची शक्यता आहे. दोन्ही दिवशी दुपारी पावसासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. इंग्लंडच्या हवामान विभागाने म्‍हटलं आहे की, शनिवारी ( दि.१०) सकाळी ढग हळूहळू दूर होत आहेत, त्यानंतर भरपूर सूर्यप्रकाश आहे. मात्र वाढत्या प्रमाणात उष्ण आणि दमटपणा यामुळे दुपारपर्यंत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.लंडनमध्ये सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत पावसाची ५ टक्के शक्यता आहे; परंतु दुपारी 3 वाजेपर्यंत पावसाची शक्यता 10 टक्के आहे. अशा स्थितीत पावसामुळे तिसऱ्या सत्राच्या खेळावर परिणाम होऊ शकतो.

अंतिम सामन्यात तीन दिवसांच्या खेळानंतर ऑस्ट्रेलियाकडे २९६ धावांची आघाडी आहे आणि दुसऱ्या डावात सहा विकेट्स शिल्लक आहेत. आता ऑस्ट्रेलिया आपली आघाडी ४०० धावांपेक्षा अधिक करण्‍याचा प्रयत्‍न करेल. ऑस्ट्रेलियालाचे उर्वरीत ६ गडी लवकरात लवकर तंबूत धाडण्‍याचा भारताचा प्रयत्‍न असेल. दरम्‍यान, कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. अशा परिस्थितीत पाऊस पडला तरी सामन्याचा निकाल लागण्याची शक्यता अधिक आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button