

पुढारी ऑनलाईन डेस्क : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३ चा अंतिम सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगला आहे. दोन्ही संघ ही ट्रॉफी जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरले आहेत. दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ अंतिम सामन्यासाठी काळी पट्टी बांधून मैदानात उतरला आहे. (WTC Final)
ओडिशातील बालासोर येथे शुक्रवारी (दि.०२) तीन रेल्वे गाड्याची धडक होऊन भीषण अपघात झाला. आत्तापर्यंत सुमारे २७६ जणांचा मृत्यू झाला आहे, एक हजारांपेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. ओडिशातील भीषण रेल्वे अपघातामधील मृतांची संख्या आतापर्यंत २७६ झाली आहे. या दुर्घटनेत एक हजारांपेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. दरम्यान, ओडिशा अपघातग्रस्तांना श्रद्धांजली वाहण्यासाठी टीम इंडिया काळी पट्टी बांधून मैदानात उतरली आहे. काळी पट्टी बांधून टीम इंडियाने अपघातात प्राण गमावलेल्या आणि त्यांच्या नातेवाईकांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. (WTC Final)
ऑस्ट्रेलियाकडून, डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा सलामीला उतरले आहेत. ऑस्ट्रेलियाला मोहम्मद सिराजने पहिला धक्का दिला आहे. त्याने उस्मान ख्वाजाला शून्यावर बाद केले. ख्वाजाला भोपळाही न फोडता तंबूत परतला आहे. डेव्हिड वार्नर आणि मार्नस लाबुशेन सध्या क्रिजवर टिकून आहेत. (WTC Final)