Ajinkya Rahane 5000 Runs : अजिंक्य रहाणे बनला पाच हजारी मनसबदार! ठरला 13वा भारतीय खेळाडू

पुढारी ऑनलाईन डेस्क : Ajinkya Rahane 5000 Runs : ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळल्या जात असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात अजिंक्य रहाणे विकेटसमोर टीम इंडियासाठी भिंतीसारखा उभा राहिला. 18 महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या रहाणेने अप्रतिम फलंदाजी केली आणि संघाचा डाव सावरला. त्याने 69 धावा करताच कसोटी कारकिर्दीत 5000 धावांचा टप्पा पूर्ण केला. अशी कामगिरी करणारा तो 13वा भारतीय खेळाडू ठरला आहे.
रहाणे-शार्दुलची 7 व्या विकेटसाठी शतकी भागिदारी
WTC च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 469 धावा केल्या. त्याचवेळी टीम इंडिया फलंदाजीसाठी उतरली तेव्हा त्याची सुरुवात चांगली झाली नाही. 71 धावांवर भारताने 4 महत्त्वाच्या विकेट गमावल्या. मात्र यानंतर अजिंक्य रहाणेने एक टोक सांभाळले. त्याने सामन्याच्या दुस-या दिवशी रवींद्र जडेजा 48 (51) सोबत 71 धावांची भागिदारी रचली. त्यानंतर सामन्याच्या तिस-या दिवशी श्रीकर भरत 5 (15) धावांवर बाद झाल्यानंतर त्याने शार्दुल ठाकूरसह संघाचा डाव सांभाळला. या जोडीने सातव्या विकेटसाठी शतकी भागिदारी केली. लंच ब्रेक पर्यंत भारताने 6 बाद 260 धावांपर्यंत मजल मारली असून रहाणे 89 आणि शार्दुल 36 धावांवर खेळत आहेत. फॉलोऑन टाळण्यासाठी भारताला आणखी 10 धावा करायच्या आहेत.
5000 Test runs and going strong 💪💪
Keep going, @ajinkyarahane88 #TeamIndia pic.twitter.com/VixAtmYrRK
— BCCI (@BCCI) June 9, 2023
आणखी वाचा :