Ajinkya Rahane WTC Final : अजिंक्य रहाणेचे अनोखे शतक! | पुढारी

Ajinkya Rahane WTC Final : अजिंक्य रहाणेचे अनोखे शतक!

लंडन, पुढारी ऑनलाईन : Ajinkya Rahane WTC Final : टीम इंडियाचा स्टार खेळाडू अजिंक्य रहाणेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात (WTC Final) मोठा विक्रम केला आहे. ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सामन्यात त्याने 100 वा कसोटी झेल पकडून भारतीय संघासाठी ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. त्याच्या या अनोख्या रेकॉर्डची चर्चा होत असून तो आता दिग्गज खेळाडूंच्या पक्तीत पोहचला आहे.

भारतीय संघासाठी मधल्या फळीत खेळणा-या अजिंक्य रहाणेचे प्रदीर्घ कालावधीनंतर संघात पुनरागमन झाले आहे. तत्पूर्वी त्याने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी शानदार खेळी खेळल्या. त्याची ही कामगिरी पाहून त्याची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी निवड झाली. त्यानेही पुनरागमन करताच कसोटी क्रिकेटमध्ये 100 झेल पकडून मोठा विक्रम केला. अशी कामगिरी करणारा तो भारताचा 7वा खेळाडू ठरला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन पॅट कमिन्सला त्याचा 100 वा बळी ठरला. (Ajinkya Rahane WTC Final)

मोहम्मज सिराज सामन्याची 122 वी ओव्हर टाकायला आला होता. यावेळी पॅट कमिन्स क्रिजवर होता. मोहम्मज सिराजने टाकलेला बॉल पॅट कमिन्सच्या बॅटला लागून थेट अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) हातात गेला. अजिंक्य रहाणेने ही कॅच घेऊन कसोटी कारकिर्दीतली 100 कॅचचा पल्ला गाठला. त्यामुळे अजिंक्य रहाणे टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये कॅचचं अनोखे शतक साजर केले. या त्याच्या विक्रमाने त्याने दिग्गज खेळाडूंच्या पंक्तीत स्थान मिळवलं आहे. (Ajinkya Rahane WTC Final)

आतापर्यंत कसोटीत सर्वांधिक कॅच घेण्याचा विक्रम राहुल द्रविडच्या नावे आहेत. राहुलने कसोटीत 209 कॅच घेतल्या आहेत. त्यानंतर वीवीएस लक्ष्मणचा नंबर लागतो. वीवीएस लक्ष्मणने कसोटीत 135 कॅच घेतल्या आहेत. यानंतर क्रिकेटचा देव सचिन तेंड़ूलकरचा नंबर लागतो. त्याने 115 कॅच घेतल्या होत्या. तर विराट कोहलीने 109 कॅच घेतल्या होत्या. विराट नंतर सुनील गावस्करने 108 कॅच घेतल्या. यानंतर मोहम्मद अझरूद्दीनने 105 कॅच घेतल्या. अजिक्य रहाणेने आता या पंक्तीत स्थान मिळवले आहे. त्याने कसोटीत 100 कॅच घेतल्या आहेत.

‘या’ खेळाडूंनी पकडले सर्वाधिक झेल

राहुल द्रविड : 209
वीवीएस लक्ष्मण : 135
सचिन तेंडूलकर : 115
विराट कोहली : 109
सुनील गावस्कर : 108
मोहम्मद अझरूद्गीन : 105
अजिंक्य रहाणे : 100

Back to top button