WTC History : डब्ल्यूटीसीच्या इतिहासात केवळ ‘या’ धडाकेबाज फलंदाजाने ठोकले त्रिशतक!

WTC History : डब्ल्यूटीसीच्या इतिहासात केवळ ‘या’ धडाकेबाज फलंदाजाने ठोकले त्रिशतक!

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : WTC History : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात आजपासून (दि. 7) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) अंतिम सामन्याला सुरुवात होणार आहे. टीम इंडियाची (Team India) ही दुसरी डब्ल्यूटीसी फायनल (WTC Final) आहे. 2021 मध्ये पहिल्या फायनलमध्ये न्यूझीलंडने भारताचा 8 गडी राखून पराभव केला होता. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या इतिहासात आतापर्यंत फक्त एकाच फलंदाजाने त्रिशतक झळकावले आहे आणि हा खेळाडू डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत भारताविरुद्ध सामना खेळणार आहे. चला जाणून घेऊया या खेळाडूबद्दल.

केवळ 'या' खेळाडूने झळकावले त्रिशतक (WTC History)

ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने (david warner) जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या इतिहासात त्रिशतक (WTC triple century) झळकावले आहे. त्याने 2019 मध्ये अॅडलेड येथे पाकिस्तानविरुद्ध 418 चेंडूत 335 धावा केल्या. या विक्रमी खेळीत त्याने 39 चौकार आणि 1 षटकार लगावला होता. त्याच्यामुळेच ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या डावात 589 धावा केल्या होत्या. याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने पहिल्या डावात 302 धावा आणि दुसऱ्या डावात 239 धावा केल्या. अखेर त्यांनी हा सामना एक डाव आणि 48 धावांनी गमावला.

भारताविरुद्ध खेळणार सामना

डेव्हिड वॉर्नर भारताविरुद्ध (david warner vs india) नेहमीच चांगली कामगिरी करतो. अशा स्थितीत जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारतीय गोलंदाजांनी त्याच्यापासून सावध राहण्याची गरज आहे. एकदा वॉर्नर क्रीजवर राहिला की त्याला बाद करणे कठीण होते. त्याने भारतासाठी 20 कसोटीत 1174 धावा केल्या आहेत, ज्यात चार शतके आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे.

ऑस्ट्रेलियाने अनेक सामने जिंकले (WTC History)

डेव्हिड वॉर्नरची (david warner wtc) गणना जगातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये केली जाते. त्याने ऑस्ट्रेलियन संघासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. डावाच्या सुरुवातीला स्फोटक फलंदाजीसाठी तो प्रसिद्ध आहे. त्याने ऑस्ट्रेलियासाठी 103 कसोटी सामन्यांमध्ये 8158 धावा केल्या आहेत ज्यात 25 शतकांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news