Rohit Sharma Injured : भारतीय संघाला मोठा धक्का, कर्णधार रोहित शर्मा जखमी! | पुढारी

Rohit Sharma Injured : भारतीय संघाला मोठा धक्का, कर्णधार रोहित शर्मा जखमी!

पुढारी ऑनलाईन डेस्क : Rohit Sharma Injured : जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 जूनपासून खेळवला जाणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी भारताला धक्का बसला आहे. अनेक खेळाडू जखमी झाल्यानंतर आता रोहित शर्मालाही नेट प्रॅक्टिसमध्ये दुखापत झाल्याचे समोर आले आहे. त्याची तत्काळ संघाच्या वैद्यकीय पथकाने तपासणी केली. मात्र त्यानंतर रोहितने सराव सत्रात भाग घेतला नाही. दरम्यान, कर्णधार रोहितची दुखापत गंभीर नसून त्याने खबरदारी म्हणून सराव केला नसल्याचे वृत्त आहे. याआधी सोमवारी इशान किशनही नेट सरावादरम्यान हातावर चेंडू अदळल्याने जखमी झाला होता.

रोहितच्या अंगठ्याला झालेली दुखापत गंभीर नाही (Rohit Sharma Injured)

WTC फायनलसाठी भारतीय संघ जोरदार सराव करत आहे. दरम्यान, कर्णधार रोहित शर्माला दुखापत झाली. वृत्तानुसार, नेट प्रॅक्टिस दरम्यान एक वेगवान चेंडू रोहितच्या डाव्या हाताच्या अंगठ्यावर आदळला. यानंतर तो सराव सत्रा सोडून तंबूत परतला. खबरदारीचा उपाय म्हणून त्याने पुढील नेट सराव केला नाही. मात्र, काही वेळाने भारतीय चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमीही समोर आली. रोहित शर्माची दुखापत फारशी गंभीर नसल्याचे वैद्यकीय पथकातील एका अधिका-याने सांगितले. तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम कसोटी सामना खेळू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. (Rohit Sharma Injured)

आयपीएलनंतर खेळाडूंना विश्रांती नाही

वास्तविक, इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 चा हंगाम खेळल्यानंतर भारतीय खेळाडूंनी थेट लंडन गाठले. आयपीएलचा अंतिम सामना 29 मे रोजी (रिझर्व्ह-डे) खेळला गेला. ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा पराभव करत विजेतेपद पटकावले. मुंबई इंडियन्सने 26 मे रोजी रोहितच्या नेतृत्वाखाली एलिमिनेटर खेळला होता. अशा स्थितीत भारतीय खेळाडूंना विश्रांती मिळालेली नाही.

Back to top button