Team India West Indies Tour: टीम इंडियाच्या विंडिज दौ-याचे संभाव्य वेळापत्रक जाहीर! | पुढारी

Team India West Indies Tour: टीम इंडियाच्या विंडिज दौ-याचे संभाव्य वेळापत्रक जाहीर!

पुढारी ऑनलाईन डेस्क : Team India West Indies Tour : डब्ल्यूटीसी फायनलनंतर (WTC Final) टीम इंडिया वेस्ट इंडिजच्या दौ-यावर (Team India west Indies Tour) जाणार आहे. भारतीय संघ कॅरेबियन मैदानांवर दोन कसोटी, तीन वनडे आणि पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार असून या दौ-याला जुलैपासून सुरुवात होणार आहे. दरम्यान, भारतीय क्रिकेट चाहते या विंडिज दौ-याच्या वेळापत्रकाची वाट पाहत होते. आता त्याचे संभाव्य वेळापत्रक समोर आले आहे. यासोबतच विंडिज दौ-यातील सामने टीव्ही, मोबाईलवर कसे पाहू शकाल, याबाबतही एक अपडेट समोर आली आहे.

जुलै ते ऑगस्ट दरम्यान टीम इंडियाचा विंडिज दौरा (Team India West Indies Tour)

टीम इंडिया (Team India) आणि विंडिज () यांच्यात पहिला दोन सामन्यांची कसोटी मालिका होईल. या साठी डॉमिनिका आणि त्रिनिदादची निवड झाल्याचे समजते आहे. क्रिकबझच्या अहवालानुसार, वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाच्या तात्पुरत्या वेळापत्रकानुसार, बार्बाडोस, त्रिनिदाद आणि गयाना येथे तीन वनडे खेळले जाऊ शकतात. टी-20 मालिकेतील पहिले तीन सामने वेस्ट इंडिजमध्ये होणार आहेत आणि नंतरचे दोन सामने फ्लोरिडा, यूएसए येथे खेळवले जातील. दरम्यान, बीसीसीआयने वेळापत्रक निश्चित केल्यानंतर सामन्यांच्या औपचारिक तारखा जाहीर केल्या जातील, असे अहवालात म्हटले आहे.

टीम इंडिया 5 ते 6 जुलैदरम्यान वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना होणार असल्याचे समजते आहे. त्यानंतर 12 जुलैपासून 13 ऑगस्टपर्यंत दोन्ही देशांच्या संघांमध्ये क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटच्या मालिका खेळवल्या जातील. असे कळते की, BCCI आणि वेस्ट इंडिज क्रिकेटचे सर्वोच्च अधिकारी इंग्लंडमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप दरम्यान एकमेकांना भेटतील, त्यानंतर संपूर्ण वेळापत्रकाची अंतिम घोषणा केली जाऊ शकते.

जिओ सिनेमावर फ्रीमध्ये पाहू शकाल सामने

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी, वनडे, टी-20 या मालिकेतील सामने कुठे पहायला मिळतील याची चाहत्यांना उत्सुकता आहे. दरम्यान, या मालिकेचे डिजिटल हक्क Viacom18 ने विकत घेतल्याची माहिती मिळाली आहे. जिओ सिनेमावर सर्व सामने फ्रीमध्ये पहायला मिळतील, असे समजते आहे. (Team India West Indies Tour)

असे देखील कळते की ड्रीम स्पोर्ट्स लिनिअर अधिकारांसाठी राष्ट्रीय प्रसारक प्रसार भारती सोबत एक करार तयार करत आहे. ज्या अंतर्गत डीडी स्पोर्ट्स वाहिनीवरून टीव्हीवर हे सामने पहायला मिळतील.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज मालिकेचे संभाव्य वेळापत्रक

पहिली कसोटी : 12-16 जुलै (डॉमिनिका)
दुसरी कसोटी : 20-24 जुलै (त्रिनिदाद)

पहिली वनडे : 27 जुलै (बार्बाडोस)
दुसरी वनडे : 29 जुलै (बार्बाडोस)
तिसरी वनडे : 1 ऑगस्ट (त्रिनिदाद)

पहिला टी-20 सामना : 4 ऑगस्ट (त्रिनिदाद)
दुसरा टी-20 सामना : 6 ऑगस्ट (गयाना)
तिसरा टी-20 सामना : 8 ऑगस्ट (गयाना)
चौथा टी-20 सामना : 12 ऑगस्ट (फ्लोरिडा)
पाचवा टी-20 सामना : 13 ऑगस्ट (फ्लोरिडा)

Back to top button