Ruturaj Gaikwad Wedding : ऋतुराज गायकवाड अडकला विवाहबंधनात | पुढारी

Ruturaj Gaikwad Wedding : ऋतुराज गायकवाड अडकला विवाहबंधनात

पुढारी ऑनलाईन डेस्क : चेन्नई सुपर किंग्जचा स्टार फलंदाज आणि भारतीय क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड विवाहबंधनात अडकला आहे. ऋतुराजने महाराष्ट्राकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या उत्कर्षा पवार सोबत सात फेरे घेतले. 3 जून रोजी त्यांचा विवाह सोहळा पार पडला. ऋतुराजने लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

ऋतुराज उत्कर्षाला खूप दिवसांपासून डेट करत होता शनिवारी त्यांनी लग्न केले. उत्कर्षा आयपीएलचे सामने पाहण्यासाठी अनेकदा येत होती. IPL 2023 च्या फायनल मॅचमध्ये देखील उत्कर्षा मॅच पाहण्यासाठी आली होती. सामना संपल्यानंतर ऋतुराजने ट्रॉफी हातात घेतलेला दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. ऋतुराज आणि उत्कर्षा यांचे महाबळेश्वर येथे लग्न झाले. दोघांनीही आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

ऋतुराजने लग्नासाठी टीम इंडियातून रजा घेतली होती. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी राखीव खेळाडू म्हणून त्याची निवड करण्यात आली होती. परंतु त्याने आपले नाव मागे घेतले. त्यामुळे ऋतुराजच्या जागी यशस्वी जैस्वाल टीम इंडियामध्ये सामील झाला.

हेही वाचा : 

Back to top button