Wrestlers Protest : भारतीय कुस्ती संघाला निलंबनाचा इशारा

Wrestlers Protest : भारतीय कुस्ती संघाला निलंबनाचा इशारा
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : गेल्या महिन्याभरापासून भारतीय कुस्ती संघाचे (डब्ल्यूएफआय) प्रमुख बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाची आता जागतिक कुस्ती संघटनेने गंभीर दखल घेतली असून 45 दिवसांत निवडणूक नाही झाली तर भारतीय कुस्ती महासंघाला निलंबित केले जाईल, असा कडक इशारा दिला आहे. भारतीय मल्लांना डांबून ठेवणे, योग्य चौकशी केली न जाणे खेदजनक आहे, असे निरीक्षण या सर्वोच्च संघटनेने यावेळी नोंदवले. (Wrestlers Protest)

बृजभूषण सिंह यांच्या अटकेची मागणी करणार्‍या आंदोलक कुस्तीपटूंना कुस्तीची सर्वोच्च संस्था असलेल्या जागतिक कुस्ती संघटनेच्या भूमिकेमुळे एक प्रकारे पाठबळ मिळाले आहे. जागतिक कुस्ती संघटनेने दिल्ली पोलिसांनी कुस्तीपटूंना ताब्यात घेतल्याबद्दल निषेध केला. तसेच निवडणूक लवकर घेण्याकडे लक्ष पुरवावे, अशी सूचना केली. (Wrestlers Protest)

कुस्तीपटू विनेश फोगट, साक्षी मलिक यांनी बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले असून यावर मागील बर्‍याच कालावधीपासून आंदोलन सुरू आहे. यापूर्वी, विनेश, साक्षी आणि बजरंग यांच्यासह आंदोलकांना दिल्ली पोलिसांनी 28 मे रोजी संसदेच्या नवीन इमारतीकडे जाण्याचा प्रयत्न करत असताना ताब्यात घेतले होते.

आता जागतिक कुस्ती संघटनेने देखील बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात निष्पक्ष चौकशी व्हायला हवी, असे म्हटले आहे. या सोबतच या प्रकरणी कुस्तीपटूंचे म्हणणे जाणून घेण्यासाठी त्यांच्यासोबत बैठक घेण्याची घोषणा संघटनेने केली आहे. जागतिक कुस्ती संघटनेचे अध्यक्ष नेनाद लालोविक यांनी भारतीय कुस्ती संघाबाबतची माहिती गेल्या आठवड्यात मागवली होती. या पत्राच्या प्रती लालोविक यांनी भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पी.टी. उषा आणि इतर अधिकार्‍यांनाही पाठवल्या होत्या.

बजरंग

ऑलिम्पिक :

कांस्य / 2021 टोकियो स्पर्धा

वर्ल्ड चॅम्पियनशिप :

रौप्य / 2018 बुडापेस्ट
कांस्य / 2013 बुडापेस्ट
कांस्य / 2019 नूर सुलतान
कांस्य / 2022 बेलग्रेड

आशियाई स्पर्धा :

सुवर्ण / 2018 जकार्ता
रौप्य / 2014 इंचेऑन

राष्ट्रकुल :

सुवर्ण 2018 गोल्डकोस्ट
सुवर्ण 2022 बर्मिंगहम
रौप्य 2014 ग्लास्गो

आशियाई चॅम्पियनशिप :

सुवर्ण / 2017 नवी दिल्ली
सुवर्ण / 2019 क्झियान
रौप्य / 2014 अ‍ॅस्टाना
रौप्य / 2020 नवी दिल्ली
रौप्य / 2021 अ‍ॅलमॅटी
रौप्य / 2022 युलॅनबॅटोर
कांस्य / 2013 नवी दिल्ली
कांस्य 2018 बिश्केक

राष्ट्रकुल :

सुवर्ण / 2017 ब—ॅकपॅन
सुवर्ण / 2016 सिंगापूर

साक्षी मलिक

ऑलिम्पिक :

कांस्य / 2016 रिओ

राष्ट्रकुल :

सुवर्ण / 2022 बर्मिंगहम
रौप्य / 2014 ग्लास्गो
कांस्य / 2018 गोल्डकोस्ट

आशियाई चॅम्पियनशिप :

कांस्य / 2015 दोहा
रौप्य / 2017 नवी दिल्ली
कांस्य / 2018 बिश्केक
कांस्य / 2019 क्झीयान

राष्ट्रकुल :

कांस्य / 2013 जोहान्सबर्ग
सुवर्ण / 2017 जोहान्सबर्ग

विनेश

वर्ल्ड चॅम्पियनशिप

कांस्य / 2022 बेलग्रेड
कांस्य / 2019 नूल सुलतान
सुवर्ण / 2018 जकार्ता
कांस्य / 2014 इंचेऑन

राष्ट्रकुल

सुवर्ण / 2014 ग्लास्गो
सुवर्ण / 2018 गोल्डकोस्ट
सुवर्ण / 2022 बर्मिंगहम

आशियाई चॅम्पियनशिप

सुवर्ण / 2021 अ‍ॅलमॅटी
रौप्य / 2015 दोहा
रौप्य / 2017 नवी दिल्ली
रौप्य / 2018 बिश्केक
कांस्य / 2013 नवी दिल्ली
कांस्य / 2016 बँकॉक
कांस्य / 2019 क्झियान
कांस्य / 2020 नवी दिल्ली

आंदोलक कुस्तीपटूंच्या पदकांचा तपशील

दरम्यान, बृजभूषण सिंह यांच्या अटकेची मागणी करणार्‍या आंदोलक कुस्तीपटूंनी आपली पदके गंगा नदीत विसर्जन करण्याचा निर्णय घेतला होता; परंतु शेतकरी नेत्यांनी त्यांची समजूत काढल्यानंतर त्यांनी हा निर्णय बदलला. तूर्तास, त्यांनी आपली पदके नरेश टिकैत यांच्याकडे सुपूर्द केली आहेत. याच पार्श्वभूमीवर, बजरंग, साक्षी व विनेश यांनी जिंकलेल्या पदकाचा लेखाजोखा…

निवडणूक घेण्यासाठी 45 दिवसांची मुदत

जागतिक कुस्ती संघटनेने भारतीय कुस्ती संघाची कार्यकारिणी निवडण्यासाठी 45 दिवसांची मुदत दिली आहे. 45 दिवसांच्या आत नवी कार्यकारिणी अस्तित्वात आली नाही तर भारतीय कुस्ती संघ निलंबित केला जाईल आणि त्यानंतर सर्व स्पर्धांमध्ये भारताला आपले खेळाडू उतरवता येणार नाहीत. या परिस्थितीत भारतीय मल्लांना तटस्थ देशातर्फे खेळावे लागू शकते.

बृजभूषण सिंह नेमके काय म्हणाले?

याबाबत बोलताना बृजभूषण सिंह म्हणाले की, आंदोलक कुस्तीपटूंना ते काय करत आहेत हेच कळत नाही. दिल्ली पोलिस तपास करत आहेत. मी दोषी असल्यास मला अटक केली जाईल. कुस्तीपटूंचे आरोप खोटे आहेत, याचा मी येथे पुनरुच्चार करु इच्छितो. माझ्यासह सर्व कुस्तीपटूंची नार्को टेस्ट करण्याचे मी आणखी एकदा थेट आव्हान देतो.

अटकेसाठी पुरेसे पुरावे नसल्याची माहिती चुकीची : दिल्ली पोलिस

भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष बृजभूषण सिंग यांच्याविरोधातील तपास प्रगतीपथावर असून त्यांना अटक करण्यासाठी पुरेसे पुरावे नसल्याची जी माहिती दिली जात आहे, ती चुकीची आहे, असे दिल्ली पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान कुस्तीपटूंच्या समर्थनासाठी 1 जून रोजी देशव्यापी आंदोलन करण्याचे आवाहन संयुक्त किसान मोर्चाने केले आहे. सिंग यांच्या अटकेच्या मागणीसाठी कुस्तीपटू आंदोलन करीत आहेत.

पोस्को कायदा लावला जात नाही, कपिल सिब्बल यांचा आरोप

सत्ताधारी भाजपचे भाजपचे खासदार असल्यामुळे भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांना पोस्को कायदा लावत त्यांना अटक केली जात नसल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे खासदार कपिल सिब्बल यांनी केला आहे. अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचारासाठी पोस्को कायद्यानुसार कारवाई केली जाते व अशा प्रकरणात गुन्हा दाखल झाला की लगेच आरोपीला अटक केली जाते.

हेही वाचा; 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news