शिवाजी विद्यापीठ : बी.कॉम तृतीय वर्षाचा पेपर फुटला | पुढारी

शिवाजी विद्यापीठ : बी.कॉम तृतीय वर्षाचा पेपर फुटला

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : शिवाजी विद्यापीठ उन्हाळी सत्र परीक्षा अंतर्गत बुधवारी b.com भाग ३ सत्र सहा ॲडव्हान्स अकाउंटन्सी पेपर ४ टॅक्सेशन हा पेपर फुटल्याची माहिती समोर आली आहे. विद्यापीठ परीक्षा विभागाने तात्काळ खबरदारी घेत तासाभराच्या अंतराने दुसरा पेपर घेऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळले आहे. शिवाजी विद्यापीठ उन्हाळी सत्र परीक्षांना प्रारंभ झाला आहे. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यामधील विविध केंद्रावर परीक्षा सुरू आहेत.

बुधवारी (दि.३१) b.com भाग 3 सत्र सहा ॲडव्हान्स अकाउंटन्सी पेपर 4 टॅक्सेशन हा पेपर दुपारी दोन ते तीन या वेळेत होता. परंतु, कोल्हापूर जिल्ह्यातील एका परीक्षा केंद्रावरून हा पेपर फुटल्याची माहिती परीक्षा विभागाला मिळाली. तात्काळची उपाय योजना म्हणून तो पेपर रद्द केला व पेपरचा दुसरा सेट सर्व परीक्षा केंद्रांना पाठवला. तीन वाजता विद्यार्थ्यांना वेळ वाढवून देत परीक्षा सुरू झाली त्यामुळे विद्यापीठ कार्यक्षेत्रातील ३५००० विद्यार्थ्यांचे नुकसान टळले. यासंदर्भात संबंधित परीक्षा केंद्रावरून माहिती मागवण्याचे काम सुरू आहे येत्या दोन-तीन दिवसात माहिती घेऊन संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक अजितसिंह जाधव यांनी दिली

हेही वाचलंत का?

Back to top button