MS Dhoni last Viral Moment : माझे पप्‍पा जिंकले..! भावूक झालेल्‍या धाेनीच्‍या मुलीने असं केलं सेलिब्रेशन (व्‍हिडिओ) | पुढारी

MS Dhoni last Viral Moment : माझे पप्‍पा जिंकले..! भावूक झालेल्‍या धाेनीच्‍या मुलीने असं केलं सेलिब्रेशन (व्‍हिडिओ)

पुढारी ऑनलाईन डेस्क : जडेजाने शेवटच्या दोन चेंडूंवर १० धावा करत चेन्‍नई सुपर किंग्‍ज (सीएसके) संघाला आयपीएल विजतेपद मिळवून दिले. यानंतर सीएसकेच्या कॅम्पमधील दृश्य पाहून चाहते भावूक झाले. धोनीने विजयानंतर जडेजाला उचलून घेत विजेतेपदाचा जल्लोष साजरा केल्याचे पाहायला मिळाले. धाेनीचा असा जल्‍लाेष चाहत्‍यांनी प्रथमच अनुभवला. या विजयानंतर धोनीची मुलगी झिवाने जल्‍लाेष केला. धाेनी आणि झिवाने साजरा केलेला हा अविस्‍मरणीय क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर माेठ्या प्रमाणावर व्हायरल हाेत आहे.

पावसामुळे राखीव दिवशी चेन्‍नई सुपर किंग्‍ज आणि गुजरात टायटन्‍स यांच्‍यातील अंतिम सामना खेळाडूंबराेबरच क्रिकेटप्रेमींसाठीही अविस्‍मरणीय ठरला. डकवर्थ लुईस पद्धतीच्या आधारे चेन्नईला विजयासाठी १५ षटकांत १७२ धावांचे लक्ष्य मिळाले; पण या सामन्‍यात प्रत्येक क्षणी चित्र बदलत राहिले. चेन्नईला शेवटच्या दोन चेंडूंवर दहा धावा हव्या होत्या. पाचव्या चेंडूवर जडेजाने षटकार मारला तर शेवटच्या चेंडूवर चौकार मारत सीएसकेला विजेतेपद मिळवून दिले.

विजयानंतर चेन्नईचा संपूर्ण संघ कर्णधार महेंद्रसिंह धोनी वगळता मैदानावर धावला. धोनीने काही वेळ डोळे बंद केले होते, तो भावूक झाला होता. नंतर तोही सेलिब्रेशन करण्यासाठी टीममध्ये मैदानावर  पोहोचला. विजयानंतर चेन्नईच्या सर्व खेळाडूंनी जल्लोष केला. धोनीही खूप आनंदी दिसत होता.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये चेन्नईचे सर्व खेळाडू विजयानंतर आनंद साजरा करत आहेत. धोनीनेही त्याची मुलगी झिवासोबत विजय साजरा केला. व्हिडिओमध्ये झिवा धोनीला मिठी मारताना दिसत आहे, यावेळी धोनीची पत्नी साक्षीही खूपच भावूक झाल्याचे  व्हिडिओमध्‍ये  दिसत आहे.


हेही वाचा : 

Back to top button