WTC Final 2023 : इशानने वाढवले रोहितचे टेन्शन | पुढारी

WTC Final 2023 : इशानने वाढवले रोहितचे टेन्शन

मुंबई (वृत्तसंस्था) : शुक्रवारी मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगला. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा इशान किशन जखमी झाला. हा खेळाडू वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी टीम इंडियाचा देखील एक भाग आहे. टीम इंडियासोबत तो इंग्लंडला जाणार आहे, पण आयपीएलदरम्यान झालेल्या दुखापतीमुळे तो बाहेर पडला तर त्याच्या जागी कोण? हा प्रश्न आहे. (WTC Final 2023)

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना सात जूनपासून इंग्लंडमध्ये खेळला जाणार आहे. या शानदार सामन्यासाठी टीम इंडियाचे काही खेळाडू इंग्लंडलाही पोहोचले आहेत. उर्वरित खेळाडू आयपीएल फायनलनंतर इंग्लंडला रवाना होतील. दरम्यान इशान किशनच्या दुखापतीने संघ व्यवस्थापन आणि कर्णधार रोहित शर्माचे टेन्शन दुप्पट केले आहे. या खेळाडूच्या दुखापतीमुळे टीम इंडियाच्या संघात मोठे बदल केले जाऊ शकतात. के.एल. राहुलच्या दुखापतीमुळे इशान किशनचा टीम इंडियाच्या संघात समावेश करण्यात आला होता. के.एल. राहुललाही आयपीएलदरम्यान एका सामन्यात दुखापत झाली होती. असाच काहीसा प्रकार इशान किशनसोबत घडला आहे. आता इशान किशनच्या जागी वृद्धिमान साहा, अनुज रावत, जितेश शर्मा यांना टीम इंडियात स्थान मिळू शकते. (WTC Final 2023)

हेही वाचा;

Back to top button