McLaren Artura : टार्झन चित्रपटातील हुबेहुब सुपरकार भारतात लॉन्च; पहा लुक…

McLaren Artura : टार्झन चित्रपटातील हुबेहुब सुपरकार भारतात लॉन्च; पहा लुक…

पुढारी ऑनलाईन डेस्क : ब्रिटिश लक्झरी कार कंपनी मॅक्लारेन (McLaren Artura) ऑटोमोटिव्हने शुक्रवारी (दि. २६) भारतात नवी हाईब्रिड कार लॉन्च केली. या नव्या कारचा लुकवर अनेकजण फिदा आहेत. टार्झन चित्रपटातील कारसारखा लुक असणारी ही कार आता भारतात लॉन्च झाल्यामुळे कार चाहत्यांसाठी मोठी खुशखबर आहे.

मॅक्लॉरेन कंपनीच्या या नव्या सुपरकारचे ऑर्टुरा (McLaren Artura) असे नाव आहे. या कारला 'आर्ट अँड फ्यूचर' या शब्दावरुन आर्टुरा हे नाव दिले आहे. मॅक्लॉरेन ऑटोमेकर कंपनीची भारतातील ही पहिलीच हाय-परफॉर्मन्स हायब्रिड सुपरकार आहे. ही कार भारतात लॉन्च करण्यापूर्वी नोव्हेंबर 2022 मध्ये मुंबईत पहिली डीलरशीप चालू केली. कंपनीने लॉन्च केलेल्या या नव्या सुपरकारची एक्स शोरुम किंमत ५.१ कोटी इतकी असेल.

आर्टुराच्या 4 ड्रायव्हिंग मोड विषयी माहिती (McLaren Artura)

आर्टुरा कार चार ड्रायव्हिंग प्रकारात पहायला मिळेल. यामध्ये ई-मोड, कम्फर्ट, स्पोर्ट आणि ट्रॅक हे प्रकार असतील. यातील ई-मोड हा सायलेंट स्टार्ट-अपसाठी डीफॉल्ट मोड आहे. ऑर्टुरा या ड्रायव्हिंग प्रकरात फक्त इलेक्ट्रिक पॉवरवर चालते. कम्फर्ट मोडमध्‍ये, V6 पेट्रोल इंजीन इलेक्ट्रिक मोटरसह काम करते. स्पोर्ट मोडमध्ये, इलेक्ट्रिक मोटर कमी रेव्हमध्ये टॉर्क भरते. इंजिन जास्तीत जास्त चांगला परफॉर्मन्स देण्यासाठी काम करते. शेवटचा प्रकार ट्रॅक मोड हा हायब्रिडाइज्ड पॉवरट्रेनने सुसज्ज आहे.

ऑर्टुराच्या इलेक्ट्रिक मोटर आणि इंजिनची ताकद

कंपनीने Artura मध्ये शक्तिशाली 3.0 लीटर ट्विन टर्बो V6 इंजिन दिले आहे. हे इंजिन 585 HP पॉवर जनरेट करते. तसेच इलेक्ट्रिक मोटरमुळे या पॉवरमध्ये आणखी 95 Bhp इतक्या पॉवरचा समावेश होतो. त्यामुळे या इलेक्ट्रिक मोटर आणि इंजिनची शक्ती पाहता ही सुपर कार 680 HP पॉवर निर्माण करते. असे असूनही, इतर सुपरकार्सच्या तुलनेत ही कार बरीच किफायतशीर असेल. कार रियर व्हील ड्राइव्ह आहे आणि यामध्ये 8 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आहेत.

आर्टुराच्या बॅटरी पॅक विषयी माहिती

मॅक्लारेन कंपनीने आर्टुरामध्ये कार्बन लाइटवेट आर्किटेक्चर (MCLA) तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. यामुळे भविष्यातील उच्च-कार्यक्षमता हायब्रिड (HPH) इंजिनसाठी खास डिझाइन केले गेले आहे. या सुपरकारला ई-मोटरसाठी 7.4 kWh बॅटरी पॅक मिळतो जी केवळ 31 किमीची श्रेणी देते.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news