MI vs GT : मुंबई इंडियन्स-गुजरात टायटन्स यांच्यात क्वालिफायर-2 लढत | पुढारी

MI vs GT : मुंबई इंडियन्स-गुजरात टायटन्स यांच्यात क्वालिफायर-2 लढत

अहमदाबाद; वृत्तसंस्था : आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध कोण भिडणार? याचे उत्तर देण्यासाठी पाच वेळेचा विजेता मुंबई इंडियन्स आणि गतविजेता गुजरात टायटन्स हे दोन संघ क्वालिफायर-2 लढतीत आमने-सामने येणार आहेत. अहमदाबादचे नरेंद्र मोदी स्टेडियम हे गुजरात टायटन्सचे होमग्राऊंड असले तरी मुंबईकरांसाठीही ते नवखे नाही. दोन्ही संघांत दर्जेदार खेळाडूंचा भरणा असल्यामुळे प्रेक्षकांना आज एक जबरदस्त मुकाबला पाहण्याची संधी मिळू शकते. (MI vs GT)

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स संघाने स्पर्धेतील पहिल्या सामन्यापासून चॅम्पियनसारखा खेळ केला आहे. याचे फळ म्हणून त्यांनी साखळी सामन्यात गुणतक्त्यात अव्वलस्थान मिळवले होते. पण, क्वालिफायर-1 मध्ये त्यांना चेन्नईकडून पराभव पत्करावा लागल्यामुळे फायनलमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना क्वालिफायर-2 सामना खेळावा लागत आहे. (MI vs GT)

तर दुसरीकडे रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स संघाने स्लो स्टार्ट घेत नंतर मात्र गती पकडली. स्पर्धेच्या उत्तरार्धात त्यांनी जबरदस्त खेळ करीत चौथ्या क्रमांकाने प्ले ऑफ फेरी गाठली आणि लखनौ सुपर जायंटस्ला हरवून फायनलकडे कूच केली आहे. आता त्यांना आज गुजरातचा अडथळा ओलांडून फायनलमध्ये पोहोचायचे आहे.

पिच रिपोर्ट

जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम अशी ख्याती असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीला नेहमीच अनुकूल राहिली आहे. चेन्नईपेक्षा इथे उलट परिस्थिती असेल. वेगवान गोलंदाजांना येथे चेंडूला उसळी मिळू शकते, तसेच आऊटफिल्डही वेगवान आहे; परंतु फिरकी गोलंदाजीला फारसी मदत मिळणार नाही. पण हा सामना जर लाल मातीच्या खेळपट्टीवर खेळवला तर राशिद खान आणि पीयुष चावलासारखे फिरकी गोलंदाज विकेट मिळवू शकतात.

हवामानाचा अंदाज

अहमदाबादमधील हवामान स्वच्छ व निरभ्र असून पावसाची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे सामन्यात निसर्गाचा कोणताही अडथळा नसणार आहे.

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), अर्शद खान, जेसन बेहरेनडॉर्फ, डेवाल्ड ब्रेविस, पीयुष चावला, टिम डेव्हिड, राघव गोयल, कॅमेरून ग्रीन, इशान किशन (यष्टिरक्षक), डुआन जान्सन, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, शम्स मुलानी, रमनदीप सिंह, ऋतिक शौकीन, ट्रिस्टन स्टब्स, अर्जुन तेंडुलकर, तिलक वर्मा, विष्णू विनोद, नेहल वढेरा, सूर्यकुमार यादव, संदीप वारियर, रिले मेरेडिथ, क्रिस जॉर्डन..

गुजरात टायटन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), श्रीकर भरत, अल्जारी जोसेफ, जोशुआ लिटिल, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, दर्शन नलकांडे, मोहम्मद शमी, नूर अहमद, उर्विल पटेल, राशिद खान, वृद्धिमान साहा, रविश्रीनिवासन साई किशोर, साई सुदर्शन, प्रदीप सांगवान, विजय शंकर, मोहित शर्मा, शिवम मावी, शुभमन गिल, ओडियन स्मिथ, राहुल तेवतिया, मॅथ्यू वेड, जयंत यादव, यश दयाल, दासुन शनाका.

हेही वाचा;

Back to top button