Ichalkaranji : इचलकरंजीची ओळख आता MH 51! सोशल मीडियावर स्टेटसचा पाऊस | पुढारी

Ichalkaranji : इचलकरंजीची ओळख आता MH 51! सोशल मीडियावर स्टेटसचा पाऊस

इचलकरंजी; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी (Ichalkaranji) शहर हे अगोदर पासून एम एच 09 ने ओळखले जायचे. गुरुवारी (दि. २५) महाराष्ट्र शासनाच्या परिवहन खात्याने एमएच 51 म्हणून इचलकरंजी शहरास घोषित केले. आता इचलकरंजी एम एच 51 असे ओळखले जाणार आहे. त्यामुळे सोशल मीडियावर MH 51 चा रुबाब इचलकरंजीकर दाखवत आहेत.

प्रत्येकाच्या व्हाट्सअप स्टेटसला इचलकरंजी वजनात असे स्टेटस घुमत आहेत. कोण म्हणतंय नाही तटत तर कोण म्हणतंय ना जिल्हा ना तालुका पण कायम वजनात. अनेकांनी आपला गाडीचा नंबर एम एच 51 असे टाकून स्टेटसला ठेवलं आहे. परिवहन खात्याने काढलेल्या या जीआरमुळे इचलकरंजी शहरात सोशल मीडियावरून आनंद उत्सव साजरा केला जात आहे.

हेही वाचा

Back to top button