

मुंबई : आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाला यंदा प्रेक्षकांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. एका क्विझमद्वारे समोर आलेल्या आकडेवारीनुसार 62 टक्के लोकांनी चेन्नईचा संघ अजिंक्य ठरेल, अशी आशा व्यक्त केली आहे. या हंगामात चेन्नईने 5 सामन्यांत 200 हून अधिक धावा केल्या आहेत. यातील 4 सामने जिंकले. अशी कामगिरी करणारा तो मुंबईनंतरचा दुसरा संघ आहे. चेन्नईने त्यांच्या आयपीएल इतिहासात आतापर्यंत एकूण 28 वेळा 200हून अधिक धावा ठोकल्या आहेत. (MS Dhoni)
सिडनी : महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई संघाने गुजरात टायटन्सचा पराभव करत अंतिम फेरीतील आपले तिकीट निश्चित केले. चेन्नईच्या विजयात युवा गोलंदाज मथिशा पथिरानाने महत्त्वाची भूमिका बजावली. तशातच धोनीने या प्रभावशाली खेळाडूकडून षटक टाकून घेण्यासाठी मोठी हुशारी दाखवली. मात्र, ऑस्ट्रेलियन खेळाडू ब्रॅड हॉगला माहीची ही चाल आवडली नाही. धोनीने मैदानावर अनावश्यक वेळ काढल्याबद्दल त्याने ट्विट करून धोनीचे कान उपटले आहेत. (MS Dhoni)
मुंबई : चेन्नई संघाने आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश करताना गुजरातला दणका दिला. त्यानंतर यावर चेन्नईचा स्टार गोलंदाज दीपक याने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तो म्हणाला, गुजरात टायटन्ससाठी लक्ष्य इतके सोपे नव्हते. कारण, प्रेक्षक सीएसकेला पाठिंबा देत होते. आम्ही फुल्ल लेंथ चेंडू टाकण्याचा प्लॅन बनवला आणि जास्त प्रयोग केले नाहीत. जेव्हा तुम्ही उपांत्य फेरीच्या सामन्यात 170 धावांचा पाठलाग करत असाल आणि प्रेक्षकही तुमच्या विरोधात असेल, तेव्हा लक्ष्याचा पाठलाग करणे कठीण होऊन बसते.
हेही वाचा;