

मुंबई; वृत्तसंस्था : चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामन्यात चेन्नईने विजय मिळवला खरा. यादरम्यान, ऋतुराज गायकवाडने विजय शंकरचा अप्रतिम झेला घेतला. मात्र, त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. अर्थात, याच झेलामुळे सामन्याला कलाटणी मिळाली हेही तेवढेच खरे. (Ruturaj Gaikwad)
वास्तविक गायकवाडने झेल घेताना डायव्हिंग केले होते. तो झेल पाहून चेंडू कुठेतरी जमिनीला स्पर्श करत असल्याचे एकास दिसले. यामुळे मैदानावरील पंचांनी या निर्णयासाठी तिसर्या पंचाकडे जाणे योग्य मानले. त्याचवेळी, टीव्ही रिप्लेमध्ये प्रत्येक कोनातून पाहिल्यानंतर तिसर्या पंचाने कॅच योग्य ठरवला आणि शंकरला पॅव्हेलियनमध्ये जाण्याचे निर्देश दिले. दुसरीकडे गुजरातच्या चाहत्यांनी हा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले आहे. गायकवाडच्या झेलवर चाहते आपापसांत प्रश्न उपस्थित करत आहेत. याबाबत फलंदाज विजय शंकरने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. गायकवाडने झेल घेताच तो स्वत:हून पॅव्हेलियनकडे जाताना दिसला. त्याने पंचांशी कोणतेही संभाषण केले नाही, पण गुजरातचे चाहते अंपायरबद्दल वेगवेगळे ट्विट करत आहेत. (Ruturaj Gaikwad)
गायकवाडच्या झेलवर गुजरातचे चाहते खूश नसले तरी या झेलने सामन्याला कलाटणी दिली. कारण शेवटच्या चेंडूपर्यंत गुजरात सामना जिंकू शकेल, असे वाटत होते, मात्र निर्णायक प्रसंगी मथिशा पथिराणाने विजय शंकरला ऋतुराजकरवी झेलबाद करून सामन्याचे चित्र बदलले. चेन्नर्ईला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ऋतुराजला त्याच्या शानदार खेळासाठी सामनावीरचा सन्मान देण्यात आला.
हेही वाचा;