CSK : चेन्नईने नोंदवला आगळा विक्रम | पुढारी

CSK : चेन्नईने नोंदवला आगळा विक्रम

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : चेन्नई सुपर किंग्जने मंगळवारी गुजरात टायटन्सचा 15 धावांनी पराभव करून आयपीएलच्या इतिहासात एक आगळावेगळा विक्रम स्वतःच्या नावावर केला आहे. कारण, आतापर्यंत अशी कामगिरी अन्य कोणत्याही संघाला करता आलेली नाही. हा विक्रम म्हणजे चेन्नईने गुजरात टायटन्सला ऑल आऊट केले. (CSK)

पहिल्या क्वालिफायर सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने गुजरात टायटन्सविरुद्ध 172 धावा केल्या. सीएसकेकडून ऋतुराज गायकवाड (60 धावा) आणि डेव्हॉन कॉन्वे (40 धावा) यांनी चमकदार कामगिरी केली. याशिवाय रवींद्र जडेजाने 22 धावांचे योगदान दिले. या खेळाडूंमुळेच सीएसके संघ सन्मानजनक धावसंख्या उभारू शकला. (CSK)

लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. 20 व्या षटकात शेवटच्या चेंडूवर संघ 157 धावांवर ऑल आऊट झाला. गुजरात टायटन्सला ऑल आऊट करणारा सीएसके हा आयपीएलमधील पहिला संघ ठरला आहे. यापूर्वी आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सला कोणीही ऑल आऊट करू शकले नव्हते.

विजेतेपदाचा प्रबळ दावेदार

सीएसके संघ 2008 पासून आयपीएलमध्ये भाग घेत आहे. या संघाने आतापर्यंत आयपीएलमध्ये 14 हंगाम खेळले आहेत. यामध्ये संघ 12 वेळा प्ले-ऑफसाठी पात्र ठरला असून 10 वेळा अंतिम फेरीत पोहोचला आहे. महेंद्रसिंग धोनीने सीएसकेच्या नेतृत्वाखाली चार वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. यावेळीही सीएसके संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे.

हेही वाचा;

Back to top button