Accident : बस-कार अपघातात दोघे ठार; पुणे-सोलापूर महामार्गावरील मळद जवळ दुर्घटना | पुढारी

Accident : बस-कार अपघातात दोघे ठार; पुणे-सोलापूर महामार्गावरील मळद जवळ दुर्घटना

कुरकुंभ; पुढारी वृत्तसेवा : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मळद (ता. दौंड) हद्दीत खासगी बस व कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले. बुधवारी (दि. २४) रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. याबाबत रात्री उशिरापर्यंत दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

बलवंत विश्वनाथ तेलंगे (वय ३०, रा. चाकण, मुळ रा. उदगिर सोमनाथपूर, जि. लातुर) आणि नामदेव जीवन वाघमारे (वय १८, रा. भोसरी) असे मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. पुण्याहून सोलापूरकडे जाताना खासगी बस (एनएल ०१ बी २००४) आणि कार एमएच १४ डीटी ८३६३) याच्यात अपघात झाला. अपघातात कार २०० फुट खोल कालव्यात पडली. क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहन कालव्यातून बाहेर काढण्यात आले. मृत्युमुखी पडलेल्या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी दौंड उपजिल्हा ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आले होते. दोन्ही वाहने कुरकुंभ पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.

Back to top button