Brij Bhushan Singh : बृजभूषण यांना अटक होईपर्यंत जंतर-मंतर सोडणार नाही | पुढारी

Brij Bhushan Singh : बृजभूषण यांना अटक होईपर्यंत जंतर-मंतर सोडणार नाही

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : गेले काही महिने आमच्यासाठी तणावपूर्ण राहिले आहेत. जोपर्यंत बृजभूषण यांना अटक केली जात नाही, तोपर्यंत ते जंतर-मंजर सोडणार नाहीत. त्यांनी अश्रू ढाळले आहेत. मात्र आम्हाला माहिती आहे की, महिलांना न्याय देण्यासाठी एक मोठी लढाई लढावी लागू शकते आणि त्यासाठी कोणताही किंमत चुकवण्यास त्या तयार आहेत, असे स्पष्ट मत कुस्तीपटू विनेश फोगाटने व्यक्त केले आहे. दरम्यान, या प्रकरणातील सत्य बाहेर येण्यासाठी बृजभूषण सिंग आणि कुस्तीपटूंनीही नार्को टेस्ट करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. (Brij Bhushan Singh)

जंतर-मंतरवर भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध ऑलिम्पिक पदक विजेत्या कुस्तीपटूंचे आंदोलन सुरूच आहे. आशियाई गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणार्‍या विनेश फोगाटने बृजभूषण सिंह यांच्यावर नव्याने काही आरोप केले. एका इंग्रजी माध्यमाला दिलेल्या एका मुलाखतीत विनेशने तिला देखील इतर मुलींप्रमाणे इतके वर्ष सर्व गपचूप सहन करावे लागले, असा आरोप केला आहे. विनेशने सांगितले की, जानेवारी महिन्यात बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि तिला जंतर-मंतरवर प्रदर्शन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांना वाटले, त्यावेळी दोन ते तीन दिवसांत न्याय मिळेल. त्यावेळी वाटले नाही की, महिला कुस्तीपटूंच्या सन्मानासाठी पुन्हा एकदा आंदोलन करावे लागेल. (Brij Bhushan Singh)

विनेश फोगाट म्हणते की, आशियाई गेम्स जवळ आहेत. या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करायचे आहे आणि पदक जिंकायचे आहे. मात्र ही एक मोठी लढाई आहे. लैंगिक शोषणाबाबत सारखे सारखे बोलणे खूप त्रासदायक असते. त्यांना लैंगिक शोषणाबाबत कधी ओव्हरसाईट समिती, कधी पोलिस तर कधी भारतीय ऑलिम्पिक संघ समितीसमोर बोलावे लागते.

हेही वाचा; 

Back to top button