Rinku Singh vs Dhoni : रिंकू सिंहने मोडला धोनीचा ‘हा’ विक्रम! धडाकेबाज खेळीने रचला इतिहास

Rinku Singh vs Dhoni : रिंकू सिंहने मोडला धोनीचा ‘हा’ विक्रम! धडाकेबाज खेळीने रचला इतिहास
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : rinku singh vs dhoni : आयपीएलच्या प्लेऑफचे तीन संघ निश्चित झाले आहेत. शनिवारी साखळी फेरीच्या रोमांचक सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने कोलकाता नाईट रायडर्सचा अवघ्या एका धावेने पराभव केला. रिंकू सिंगने 20 व्या षटकात पुन्हा एकदा आक्रमक फलंदाजी केली. मात्र, यावेळी तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. या सामन्यात लखनौने प्रथम खेळताना 8 गड्यांच्या मोबदल्यात 176 धावा केल्या. प्रत्युत्तरात केकेआरचा संघ 7 गड्यांच्या मोबदल्यात 175 धावाच करू शकला. रिंकूने 33 चेंडूत नाबाद 67 धावा फटकाल्या.

आयपीएल 2023 मध्ये रिंकूने 14 सामन्यांमध्ये 59 च्या सरासरीने 474 धावा केल्या. त्याने 4 अर्धशतके ठोकली. यादरम्यान, त्याचा स्ट्राइक रेट 150 राहिला आहे. तो केकेआरसाठी सर्वाधिक धावा फटकावणारा फलंदाज ठरला आहे. अशा प्रकारे रिकूने सीएसकेच कर्णधार एमएस धोनीची बरोबरी केली. त्याने मधल्या फळीत फलंदाजी करताना 2018 मध्ये 76 च्या सरासरीने 455 धावा केल्या होत्या. त्यावेळी धोनेचा स्ट्राइक रेट 151 होता. जर आपण रिंकूच्या एकूण टी-20 रेकॉर्डवर नजर टाकली तर त्याने 89 सामन्यांमध्ये 30 च्या सरासरीने 1768 धावा केल्या असून यादरम्यान, त्याने 10 अर्धशतके ठोकली आहेत. 79 धावा ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याने 80 षटकारही मारले आहेत.

यूपीचा रहिवासी असलेल्या 25 वर्षीय रिंकूने अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेले नाही. आयपीएल 2023 मध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना त्याने 7 डावात 153 च्या सरासरीने 305 धावा केल्या असून त्याने 20 चौकार आणि 22 षटकार मारले. यादरम्यान, त्याचा स्ट्राइक रेट 174 आहे. त्यात 4 अर्धशतकांचाही समावेश आहे. यापूर्वी त्याने सीएसके विरुद्ध 33 चेंडूत नाबाद 53, सीएसके विरुद्ध 43 चेंडूत 53 आणि सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 31 चेंडूत नाबाद 58 धावा केल्या आहेत.

रिंकू बनला नवा फिनिशर, मोडला धोनीचा विक्रम (rinku singh vs dhoni)

वास्तविक, आयपीएलच्या 16 हंगामात नवीन फिनिशर म्हणून रिंकू सिंहचा उदय झाला आहे. एलएसजीविरुद्ध तुफानी इनिंग खेळून आपण कोणापेक्षा कमी नाही हे सिद्ध त्याने केले. सामना हरल्यानंतरही त्याला खरा सिकंदर म्हटले जात आहे. याचबरोबर रिंकूने महान फिनिशर एमएस धोनीचा विक्रम मोडला आहे. लखनौविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने 20 व्या षटकात दोन गगनाला भिडणारे षटकार ठोकले आणि माहीचा विक्रम मोडला. या लीगमध्ये शेवटच्या 2 षटकांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम यापूर्वी धोनीच्या नावावर होता. धोनीने 2019 मध्ये आरसीबीविरुद्ध 33 धावा केल्या होत्या, पण रिंकूने गुजरातविरुद्ध 44 आणि लखनऊविरुद्ध 36 धावा करून हा विक्रम केला.

लखनौ विरुद्धच्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, केकेआरला विजयासाठी शेवटच्या 2 षटकात 41 धावा करायच्या होत्या. वेगवान गोलंदाज नवीन-उल-हकने डावातील 19 वे षटक टाकले. रिंकूने पहिल्या 3 चेंडूत 3 चौकार मारले. त्याने चौथ्या चेंडूवर 2 धावा आणि 5व्या चेंडूवर षटकार ठोकला. शेवटच्या चेंडू डॉट राहिला. यानंतर वेगवान गोलंदाज यश ठाकूर 20 वे षटक टाकण्यासाठी आला. वैभव अरोराने पहिल्या चेंडूवर एकेरी धाव घेतली. पुढचा चेंडू वाईड होता. दुसरा चेंडू रिंकूने डॉट घालवला. तिसऱ्या चेंडूवर त्याने डीप मिडविकेटवर फटका मारला, पण धाव घेतली नाही. पुढचा चेंडू वाईड झाला. रिंकूने चौथ्या चेंडूवर षटकार आणि पाचव्या चेंडूवर चौकार लगावला. रिंकू सिंहने पुन्हा एकदा शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला, पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.

या पराभवासह केकेआरचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. त्याचा 14 सामन्यांमधला हा 8वा पराभव आहे. त्याचबरोबर लखनौ सुपर जायंट्सचा 14 सामन्यांमधला हा 8वा विजय आहे. पॉइंट टेबलमध्ये 17 गुणांसह संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. कृणाल पंड्याच्या नेतृत्वाखाली लखनौचा संघ आता एलिमिनेटर खेळणार आहे. गुजरात टायटन्सचा संघ पहिल्या आणि चेन्नई सुपर किंग्जचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. पात्रता फेरीत दोन्ही संघ आमनेसामने येतील. हा सामना जिंकणारा संघ थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल.

रिंकूने लखनौविरुद्ध नाबाद 67 धावांच्या खेळीत 6 चौकार आणि 4 षटकार मारले. यावेळी त्याचा स्ट्राइक रेट 203 होता. तत्पूर्वी, गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात त्याने 20 व्या षटकातील शेवटच्या 5 चेंडूत 5 षटकार मारून संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला होता. शेवटच्या 5 चेंडूत 5 षटकार मारणारा तो पहिला खेळाडू ठरला. डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयाल ओव्हर टाकत होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news